महाराष्ट्र कोरोनाविरोधातील लढाई चांगली लढतोय, पंतप्रधानांकडून कौतुक
नवी दिल्ली: भारतातील कोरोनाव्हायरसच्या दुसर्या लाटेने मागील सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. शनिवारी सलग तिसर्या दिवशी कोरोनाचे 4 लाखाहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 4,01,078 कोरोना रुग्णाची नोंद केली आहे. त्याच वेळी, कोरोनाच्या संसर्गामुळे 4,187 लोकांनी प्राण गमावले. आतापर्यंत 1 दिवसात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही सर्वात जास्त आहे. दरम्यान, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बोलून राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे असं म्हणत महाराष्ट्राच्या कोरोनाविरोधातील लढाईचं कौतुक केलं. देशातील कोरोनाच्या दुसर्या लाटेचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्र झाला आहे.
PM Narendra Modi spoke to Maharashtra CM Uddhav Thackeray on the COVID-19 related situation in the state pic.twitter.com/MvcOvUcaq1
— ANI (@ANI) May 8, 2021
यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधल्याने राज्यातील करोना स्थितीत येणाऱ्या अडचणी दूर होतील अशी आशा महाविकास आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सतत बोलत होते आणि त्यांच्या राज्यांची स्थिती जाणून घेत आहेत . यापूर्वी पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी फोनवरून कोरोनामधील परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. मुख्यमंत्री शिवराज सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज फोनवर बोलल्यानंतर त्यांना मध्य प्रदेशातील कोविड-19 च्या सद्यस्थितीबद्दल माहिती दिली आणि सतत वाढत चाललेल्या रिकवरी रेट आणि वेगाने वाढणार्या पॉज़िटिविटी रेट विषयी माहिती दिली.
आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से फोन पर चर्चा कर उन्हें मध्यप्रदेश में #COVID19 की वर्तमान स्थिति से अवगत कराया और लगातार घट रहे पॉज़िटिविटी रेट व तेज़ी से बढ़ रहे रिकवरी रेट की जानकारी दी: मध्य प्रदेश के मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान pic.twitter.com/xj4zmqz7JH
— ANI_HindiNews (@AHindinews) May 8, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 8, 2021, 2:30 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY