महाराष्ट्रातील ऑक्सिजन संशोधकाचा चेन्नईत ऑक्सिजनअभावी मृत्यू!
कोल्हापूर : कोरोनामुळे समाजातील किर्तीवंत लोकांचेही निधन होत आहे. समाजाच्या भल्यासाठी ऑक्सिजन क्षेत्रात महत्वपूर्ण संशोधन करणारे मराठमोळे संशोधक डॉ. भालचंद्र काकडे यांचं चैन्नई येथे निधन झालं.
डॉ. काकडे हे मूळचे कोल्हापूरचे होते. त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रातलं शिक्षण पूर्ण केलं. चेन्नईच्या एसआरएम संशोधन संस्थेमध्ये ते वरीष्ठ संशोधक म्हणून रुजू होते. आपल्या संशोधनाच्या जोरावर त्यांनी ७ पेटंट आपल्या नावावर केले आहेत.
डॉ. काकडे यांच्या रसायनशास्त्रातील संशोधनामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय संशोधक म्हणून ख्याती होती. काही दिवसांपूर्वी लॅबमधील काही इतर सहकारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर डॉ. काकडे यांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आले. ४४ वर्षीय डॉ. काकडे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासू लागली. शेवटच्या काही दिवसांत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधाराणा देखी होऊ लागली होती. मात्र, मंगळवारी रात्री रुग्णालयातला ऑक्सिजन पुरवठा संपला. यामध्ये प्राण गमवावे लागलेल्या १० रुग्णांमध्ये डॉ. काकडे यांचाही समावेश होता. आयुष्यभर ऑक्सिजनवर संशोधन करणारे डॉ. काकडे यांनाच शेवटच्या क्षणी ऑक्सिजन मिळू शकला नाही. दरम्यान , कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने नामवंत हिरे समाजातून गळून पडत आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 8, 2021, 1:18 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY