Breaking News

सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयासाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालयचा प्रस्ताव सादर करा

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 8, 2021 12:39 pm
|

मुंबई, : मुंबईतील सेंट जॉर्ज आणि गोकुळदास तेजपाल (जीटी) या दोन रुग्णालयांसाठी स्वतंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्याने सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाला भेट देऊन या रुग्णालयात कोविड रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचाराबद्दल माहिती घेतली त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. चंदनवाले, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. माणकेश्वर, सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.आकाश खोब्रागडे आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालया सोबतच नवीन नर्सिंग कॉलेजचा प्रस्तावही सादर करण्यात यावा असे सांगून अमित देशमुख यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात सध्या कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येतो हे लक्षात घेता या रुग्णालयासाठी स्वतंत्र ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात यावा, कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी अधिका-अधिक खाटांची संख्या वाढविण्यात यावी, रुग्णालयातील सर्व रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्रही तातडीने सुरू करण्यात यावे असे निर्देश श्री देशमुख यांनी दिले.सेंट जॉर्ज रुग्णालयाचे रूपांतर सध्या कोविड रुग्णालयात करण्यात आले असून क्रिटिकल केअर युनिट म्हणून हे रुग्णालय उपचारासाठी राखून ठेवण्यात आले आहे. असे असले तरीही या रुग्णालयातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे राष्ट्रीय स्तरावरील बरे होणाऱ्या रुग्णांच्या सरासरी पेक्षा कमी असू नये याची दक्षता घेण्यात यावी असेही श्री देशमुख यांनी यावेळी सांगितले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 8, 2021, 12:39 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *