Breaking News

कोरोचा कहर :गेल्या 24 तासांत देशात प्रथमच एका दिवसात 4 हजार 191 मृत्यू; तर राज्यात 54 हजार 22 नव्या रूग्णांची नोंद

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 8, 2021 12:21 pm
|

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. गेल्या 24 तासांत 54 हजार 22 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 898 रूग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 37 हजार 386 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या 6 लाख 54 हजार 788 इतकी आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 74 हजार 43 जणांचा मृत्यू झाला आहे.

मराठवाड्यात औरंगाबाद वगळता शुक्रवारी ४८७१ रुग्ण आढळले. ४६,६२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या – (कंसात मृत) : जालना ६८८ (१०), परभणी ६२० (२३), हिंगोली १३२ (६), नांदेड ५६८ (१५), लातूर ८८९ (३२), उस्मानाबाद ६६० (८), बीड १३१४ (१९).

विदर्भात शुक्रवारी २१० रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात १३,०६८ नवे रुग्ण आढळले. मृतांत नागपूरच्या ७९, भंडारा ११, चंद्रपूर २३, गाेंदिया ८, वर्धा २१ तर गडचिरोली जिल्ह्यातील ३ जणांचा समावेश आहे.

तर देशात शुक्रवारी प्रथमच एका दिवसात ४,१९१ मृत्यू झाले. एवढे मृत्यू कोरोना काळाच्या सुरुवातीच्या ३ महिन्यांत झाले होते. दुसरीकडे, पुन्हा ४ लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २,१८,८६,५५६ झाली असून त्यापैकी १,७९,१७,०१३ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी महाराष्ट्रातून दिलासादायक वृत्त आले. तेथे नव्या रुग्णांत सुमारे ८ हजारांची घट झाली.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 8, 2021, 12:21 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *