अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूच्या बातमीनंतर एम्सचे स्पष्टीकरण- तो अद्याप जिवंत असून कोरोनावर उपचार घेत आहे
नवी दिल्ली : कोरोनाने गँगस्टर छोटा राजनचा मृत्यू झाल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या आहेत. यावर एम्स अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, तो अद्याप जिवंतच असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तथापि, छोटा राजनच्या प्रकृतीबाबत मात्र इतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त काही प्रसिद्ध इंग्रजी व हिंदी माध्यमांनी दिले होते. परंतु वृत्तसंस्था एएनआयने यासंदर्भात थेट एम्सच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी छोटा राजन अद्याप जिवंत असल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनाची लागण झाल्यावर सुरुवातीला छोटा राजनवर तिहार तुरुंगातच उपचार सुरू होते, परंतु प्रकृती खालावल्याने त्याला दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतीबाबत इतर कोणतीही माहिती नसली, तरीही तो व्हेंटिलेटरवर असल्याचे विविध माध्यमांनी सांगितले आहे.
Underworld don Chhota Rajan is still alive. He is admitted at AIIMS for treatment of #COVID19: AIIMS official
(File photo) pic.twitter.com/gvAgKDuPqC
— ANI (@ANI) May 7, 2021
भारताचा मोस्ट वाँटेड गुंड असलेल्या राजनला दोन दशकांच्या शोधानंतर 2015 मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून अटक करण्यात आली होती. एकट्या महाराष्ट्रात राजनवर खंडणी संबंधित 68 केसेस दाखल आहेत. सप्टेंबर 2000 मध्ये राजनवर प्राणघातक हल्ला झाला होता. तिहारमध्ये राजन एकटाच होता. तेथे सुरक्षेच्या कारणास्तव इतर कैद्यांशी संवाद साधण्यासही त्याला परवानगी नव्हती. कारागृह अधिकाऱ्यांच्या संपर्कामुळे त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 7, 2021, 6:06 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY