तामिळनाडू: द्रमुकचे प्रमुख एमके स्टालिन यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ
चेन्नई : द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टालिन यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. स्टालिन यांनी प्रथमच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. स्टालिन हे गृह, सार्वजनिक व सामान्य प्रशासनासहित इतरही विभाग सांभाळणार आहेत. राजभवनात, राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. राज्यपालांनी स्टालिन यांच्या समवेत 33 जणांना मंत्रिपदाची शपथ दिली. 10 वर्षांच्या पूर्ण कालावधीनंतर द्रमुक पुन्हा सत्तेवर आला आहे. अलीकडील विधानसभा निवडणुकीत द्रमुक आघाडीने अण्णाद्रमुकची युती सत्तेतून काढून टाकली होती.
स्टालिन यांच्या मंत्रिमंडळात 33 सदस्यांचा समावेश आहे. या 33 सदस्यांपैकी 15 जण प्रथमच मंत्री बनले आहेत. स्टॅलिन यांनी या मंत्रिमंडळात दपराईमुरुगन यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना कायम ठेवले आहे. द्रमुक नेते आणि पक्षाचे सचिव दपराई मुरुगन जलसंपदामंत्री असतील. आधीच्या सरकारमध्ये 2006-11 मध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.
Chennai: DMK Chief MK Stalin takes oath as the Chief Minister of Tamil Nadu.
He is being administered the oath by Governor Banwarilal Purohit pic.twitter.com/e8IZT1aNFz
— ANI (@ANI) May 7, 2021
या वेळी मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्या 18 मंत्र्यांपैकी दुरुईमुरुगन हेही आहेत. त्याचवेळी चेन्नईचे माजी महापौर एम. सुब्रमण्यम आणि पक्षाचे नेते पी. के. सेकराबाबू पहिल्यांदा मंत्री होतील. मिळालेल्या माहितीनुसार, सुब्रमण्यम यांना आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, तर सेकराबाबूंना हिंदू धार्मिक व धर्मादाय व्यवस्थापन विभाग देण्यात आला.
मंत्रिमंडळात या 33 जणांचा समावेश
पी.के. सेकराबाबू, एस. एस. नासार, चेन्नईचे माजी महापौर सुब्रमण्यम, द्रमुकचे माजी सचेतक सखापनी, पीके मूर्ती, आर. गांधी, एस.एस. शिवशंकर, पलानीवेल त्यागराजन, अनिबल महेश मोय्यामोजी, शिव व्ही. मयनाथन, सी. व्ही. गणेशन आणि टी. मनो थांगराज आहेत. मंत्रिमंडळात दोन महिला प्रतिनिधीही आहेत यात गीता जीवन आणि एन. क्लायवीजी सेल्वराज यांचा समावेश आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 7, 2021, 2:02 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY