राज्यात कोरोनाबाधितांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी लॉकडाऊनचा विचार करावा : उच्च न्यायालय
मुंबई : राज्यात सध्या लागू केलेल्या कठोर निर्बंधांमुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती बरी आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी न्यायालयाने हा सल्ला देत मुंबईचा आदर्श राज्यातील इतर महापालिकांनीही घ्यायलाच हवा असं मतही नोंदवले आहे. दरम्यान राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये साधरण एका आठवड्यापर्यंत लॉकडाऊन असणार आहे, पण पुण्यात सर्वाधिक रुग्ण संख्या असताना तेथे लॉकडाऊन करण्यात आलेला नाही. त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी जिथे कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे तिथे संपूर्ण लॉकडाऊनचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
त्यामुळे राज्य सरकारने काही जिल्ह्यांसाठी निर्बंध अधिक कठोर करत थेट लॉकडाऊन लावण्याचा विचार करावा. पुण्यासारख्या ठिकाणी जिथे कोरोना रुग्ण संख्या फार जास्त आहेत तिथे संपूर्ण लॉकडाऊनचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, असे उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटले आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने कोरोना परिस्थिती हाताळण्यावरुन मुंबई महापालिकेचे कौतुक केल्याचा उल्लेखही उच्च न्यायालयाने केला. मुंबईतील ऑक्सिजन पुरवठ्याचा दाखला सर्वोच्च न्यायालयानेही दिला ही कौतुकास्पद बाब आहे. पण जर देशासाठी मुंबईचा आदर्श असेल राज्यातील इतर महापालिकांनाही तो घ्यायलाच हवा, असेही उच्च न्यायालयाने नमूद केले. तसेच राज्यात ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा जीव जाणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्लाही उच्च न्यायालयाने दिला.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 6, 2021, 5:25 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY