मुंबई एटीएस पथकाची मोठी कारवाई, तब्बल २१ कोटी किंमतीचे ७ किलो युरेनियम जप्त
मुंबई : एटीएस (Mumbai ATS) पथकाने गुरुवारी मोठी कारवाई केली आहे. . या दोघांकडून तब्बल 7.10 किलोग्राम रेडियोधर्मी प्राकृतिक यूरेनियम (Uranium) जप्त केले असून दोघांना अटक केली आहे. . जप्त केलेले युरेनियम भाभा औष्णिक अनुउर्जा केंद्राला पाठविण्यात आले आहे. भाभा अष्णिक केंद्राकडून या युरेनियमची गुणवत्ता, त्याची शक्ती आणि इतर बाबींबात कारवाई केली जाणार आहे. बाजारात या युरोनियमची किंमत सुमारे 21.30 कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. . दरम्यान, या दोन व्यक्तींनी इतक्या मोठ्या प्रमाणावर युरेनियम आणले कोठून आणि त्याचा पुरवठा ते कोणाला करणार होते, याबाबत पोलीस तपास करत आहेत. परंतू, इतक्या मोठ्या प्रमाणावर युरेनियम सापडल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.
पोलिसांनी युरेनियमची बेकायदेशीर रित्या वाहतूक करणे आणि जवळ बाळगणाऱ्या दोघांवर परमाणु ऊर्जा अधिनियम, 1962 आणि इतर काही कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास अद्यापही सुरु आहे.
एटीएस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, हे यूरेनियम (Uranium) जर चुकीच्या हाती गेले असते तर त्याचा दुरुपयोग झाला असता. इतकेच नव्हे तर त्याचा वापर स्फोटक बनविण्यासाठीही केला जातो. महाराष्ट्र एटीएस त्या संशयीत लॅबचा शोध घेत आहे. युरेनियम हा अत्यंत स्फोटक आणि संवेदनशील पदार्थ मानला जातो. साधारण 1 किलो युरोनियमची किंमत तब्बल 3 कोटी रुपये इतकी सांगितली जाते.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 6, 2021, 3:38 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY