मराठा आरक्षण: कुणी महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नयेत, जनतेने उगाच डोकी भडकवून घेवू नये: मुख्यमंत्री
मुंबई : आज रात्री 8.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित केले. दरम्यान , सर्वोच्च न्यायालयाने (supreme court ) मराठा आरक्षणाबाबत (maratha reservation) दिलेल्या निर्णयाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्र अजूनही कोरोनाशी लढत आहे, अशा वेळी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी लोकांसाठी अत्यंत दुर्दैवी आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करता येणार नाही. पण यानिमित्ताने कुणी महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नयेत. जनतेने उगाच डोकी भडकवून घेवू नये. मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरुच राहील ! असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला.
छत्रपती संभाजीराजे हे गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांची वेळ मागत आहेत, त्यांना पंतप्रधानांनी का वेळ दिली नाही ? मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मा. पंतप्रधानांना आहे म्हणून हा प्रश्न. राज्य विधिमंडळातील सर्व राजकीय पक्षांनी याबाबत एकमताने सहमती दर्शविली होती. सर्वोच्च न्यायालयाने यावर स्थगिती दिली. यासंदर्भात निर्णय घेण्याचा महाराष्ट्र सरकारला अधिकार नाही असे त्यांचे म्हणणे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 5, 2021, 9:35 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY