Breaking News

मोदी,फडणवीसांचे #मराठाआरक्षण रद्द होण्याचे पाप मविआ सरकारच्या माथी कसे?

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 5, 2021 6:47 pm
|

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळून लावत हा निकाल दिला. राज्यात यानिर्णयानंतर नाराजी आणि संताप अशी संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भाजप आणि केंद्र सरकारवर आरोप केले आहे. मराठा आरक्षण रद्द होण्याचे पाप केंद्र सरकार आणि मोदी यांचे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, गायकवाड आयोग फडणवीस यांनी नेमला आहे. तर कायदा देखील फडणवीस यांनीच केला आहे. उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात वकीलही फडणवीस यांनीच नेमले आहेत. १०२ वी घटना दुरुस्ती मोदींनी केली, त्यामुळे राज्यांचे आरक्षण देण्याचे अधिकार संपुष्टात आले असे असताना मराठा आरक्षण रद्द होण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारच्या माथी कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

या संदर्भात सचिन सावंत यांनी म्हटले की, ‘मोदी सरकारने १०२ व्या घटनादुरुस्तीने राज्यांचे अधिकार संपुष्टात येत नाही हे संसदेला सांगितले पण सर्वोच्च न्यायालयात टाळाटाळ का केली? इच्छा नव्हती का? आता हे पाप मोदी सरकारने निस्तरावे. आरक्षणाची शिफारस राज्य सरकार करेल. कमिशन नेमून राष्ट्रपतींकडून मोदींनी शिक्कामोर्तब करावे.’आता मोदी सरकारने १०२ व्या घटनादुरुस्तीने राज्यांचे अधिकार संपुष्टात येत नाही हे संसदेला सांगितले पण सर्वोच्च न्यायालयात टाळाटाळ का केली? इच्छा नव्हती का? आता हे पाप मोदी सरकारने निस्तरावे. आरक्षणाची शिफारस राज्य सरकार करेल. कमिशन नेमून राष्ट्रपतींकडून मोदींनी शिक्कामोर्तब करावे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 5, 2021, 6:47 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *