संतप्त नागरीकांनी लसीकरण केंद्र बंद पाडले
जव्हार– संपूर्ण महाराष्ट्रात १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना कोरोनाच्या लसीकरणाला सुरवात झाली, आज ३ मे सोमवार रोजी जव्हार सकाळी येथील पतंगशहा कुटीर रुग्णालयात लसीकरणाला सुरवात झाली, परंतु जव्हारच्या लसीकरण केंद्रावर एकच गर्दी होऊन गोंधळ उडाला. बाहेरील जिल्ह्यातील नागरिकांनी याच ठिकाणी ऑनलाइन नोंदणी करून कोरोना लसीकरण केंद्रावर गर्दी करून गोंधळ उडवून दिला. त्यानंतर जव्हार भागातील नागरिक संतप्त झाल्याने, लसीकरण केंद्र बंद केले.
कोरोना लसीकरण करण्याची ऑनलाइन प्रणाली आहे. तर जव्हार हा बहुतांशी आदिवासी भाग असल्याने, येथील अशिक्षित नागरिक असल्याने, ऑनलाइन रजिस्ट्रेशन नोंदणी करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत .या भागातील नागरिकांच्या अशिक्षित पनाचा फायदाघेत बाहेरील जिल्ह्यातील , सेलव्हास, मुंबई, वसई, विरार, नालासोपारा, येथील नागरिकांनी लसीकरणकेंद्रावर नोंदणी करून लस घेण्यासाठी मोठी गर्दी केली, त्यामुळे स्थानिक नागरीक लसीकरणा पासुन वंचित राहात असल्यामुळे संतंप्त नागरीकांनी लसीकरण केंद्रावर स्थानिक नागरिकांना प्राधान्य क्रम द्या अथवा केंद्र बंद करा अशी मागणी केली . त्यामुळे जव्हार कुटीर रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर एकच गोंधळ उडाला , मात्र त्यानंतर पत्रकार, कार्यक्रर्त्यांनी व्हॅट्स अँप ग्रुपच्या माध्यामातून पालघर जिल्हाधिकारी यांना कळविले त्यानंतर जिल्हाधिका-यांनी लगेच कारवाई करीत लसीकरण केंद्र बंद करण्यात आले. जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतर तहसीदार यांनी येऊन अखेर लसीकरण केंद्र तात्पुरते बंद केले या वेळी संतंप्त नागरीकांनी मागणी केली की,आदिवासी भागातील म्हणजेच जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यातील नागरिकांचे अगोदर लसीकरण करावे.
मात्र ठाणे, मुंबई, नालासोपारा, वसई विरार, यांची अधिक गर्दी हे धोक्याचे आहे, त्यामुळे आमच्या तालुक्यातील नागरिकांचे पहिले लसीकरण व्हावे ही आमची मागणी आहे. तसेच हा भाग आदिवासी बहुल आहे.त्यामुळे बहुतांशी लोक अशिक्षीतआहेत. .प्रत्येकाकडे मोबाईल नाहीत, ईंटरनेट सेवा नाही .त्याचा गैरफायदा हे बाहेरील लोक घेत असल्यामुळे आधारकार्ड दाखवुन लसीकरण केल जावं तरच या आदिवासी भागाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल .
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 3, 2021, 7:47 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY