Breaking News

ममता बॅनर्जी यांनी अख्ख्या भाजपाचे तोंड रंगवले : अमोल मिटकरी यांनी सुनावले खडेबोल

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 3, 2021 3:58 pm
|

पंढरपूर- मंगळवेढा अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल समोर आला आहे. भारतनानांच्या निधनामुळे त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्यामागे सहानुभूती असल्याने त्याचा त्यांना मोठा फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात असली तरी समाधान आवताडे यांना पंढरपुरात परिचारक गटाचं मोठं समर्थन मिळाल्यामुळे भालके यांना पराभवाचा सामना करावा लागला.दरम्यान , चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘

अमोल मिटकरी म्हणाले , निसटत्या विजयानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना महाराष्ट्रातील सरकार पडेल असे स्वप्न पडायला लागले आहे. पण ममता बॅनर्जी यांनी अख्ख्या भाजपाचे तोंड रंगवले आहे. जास्त हवेत जाऊ नका पाटील गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांचे थोबाड रंगवले गेले .’ असं म्हणत मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना फैलावर घेतले . त्यामुळे उन्मत्त होऊ नका ,माज करू नका, लोकांनी निसटता विजय दिला आहे. अशी टीका त्याने केली . एक 105 आमदार घरी बसले आहे त्यात एका आमदाराचे भर पडली असून त्याला सांभाळून ठेवा असा सल्ला अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांना दिला आहे . पुढे ते म्हणाले पैशाच्या जोरावर, मस्ती पैशांच्या जोरावर आणि जातीवादाच्या जोरावर तुम्ही विजय मिळवला आहे तो व्याजासकट वसूल करणार आहोत मात्र महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करायचं स्वप्नही पाहू नका असं स्वप्न औरंगजेबाने स्वराज्यावेळी पाहिलं होतं पण त्याला इथेच दफन व्हावे लागले . असा सूचक इशारा त्यांनी भाजपाला दिला . हा महाराष्ट्र आहे की केंद्र नाही. तुम्ही ज्या पद्धतीने सूड उगवला आहे हे महाराष्ट्र विसरला नाही या पराभवाचा वचपा व्याजासकट वसूल करू आणि करेक्ट कार्यक्रमाची स्वप्न पाहू नका असा इशाराही त्यांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांना दिला आहे

काय म्हणाले फडणवीस

हा मतदारसंघ अनेक वर्षांपासून काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो . भाजपा-सेनेची युती असल्यापासून या ठिकाणी त्यांचा उमेदवार कधीही निवडून आलेला नाही. पण यावेळी कमळ फुलले आहे. आवताडेंना १ लाख ९ हजार ४५० मते मिळाल्याने त्याचा विजय झाला आहे, तर  भालके यांना १ लाख ५ हजार ७१७ मते मिळाली. दरम्यान . तर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत ‘तुम्ही भाजपच्या उमेदवाराला जास्त मत देऊन यांचा करेक्ट कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा कार्यक्रम करतो’ असं आवाहन केलं होतं. अखेर फडणवीसांच्या आवाहनाला पंढरपूरकारांनी हाक देत राष्ट्रवादीला आस्मान दाखवले आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील

मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भाजपने पराभूत केल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली . ते म्हणाले, समाधान आवताडे यांचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखा आहे, वीज कनेक्शन कापणे, कोविड काळात अनेकांना पॅकेज नाही. पीकविमा नाही, त्यामुळे लोक निवडणुकीची वाट पाहत होते. राज्यातील जनतेच्या मनात महाविकास आघाडी सरकारविरोधात राग आहे. याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागेल असं त्यांनी सांगितलं त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव न घेता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला. पंढरपूरात करेक्ट कार्यक्रम झाला. दुसऱ्याचे शब्द वापरणं मला आवडत नाही. पंढरपूरमध्ये कार्यकर्ते नीट कामाला लागले तर काय होऊ शकतं हे दिसून आलं. तसेच प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांची घट्ट एकी झाल्याने हा निकाल लागला असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 3, 2021, 3:58 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *