वॉशिंग्टन पोस्टमधून थेट मोदींवर निशाणा; निवडणूक निकालानंतर मोदींची लोकप्रियता ओसरल्याचे सिध्द झाले
नवी दिल्ली : रविवारी ५ राज्यांचे निकाल जाहीर झाले, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम ही चार राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात झालेल्या मतदानाचे निकाल समोर आले. परंतु संपूर्ण देशाचे लक्ष फक्त पश्चिम बंगालमधील चुरशीच्या लढाईवर होते. अपेक्षेप्रमाणे बंगालमध्ये निकालामध्येही ‘खेला’ झाला. राज्याच्या एकूण २९२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने प्रचंड बहुमत मिळवून २१४ जागा जिंकल्या, तर राज्यात पहिले भगवे सरकार स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या भाजपला ७६ जागांवर समाधान मानावे लागले. . तसेच, केरळ आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये देखील भाजपाला फारशी चमक दाखवता आलेली नाही. तर नंदीग्राम मतदारसंघातून स्वत: ममता बॅनर्जी पराभूत झाल्याने नाट्यमय कलाटणी मिळाली. एकेकाळचे तृणमूलचे सेनापती व भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनीच ममतांना १९५६ मतांनी पराभूत केले. तथापि निकालामध्ये रात्री उशिरापर्यंत आघाडी-पिछाडी सुरू होती. अखेर रात्री ११.३० वाजता ममतांच्या पराभवाची अधिकृत घोषणा झाली. तत्पूर्वी, सायंकाळी ६ वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता यांनी पराभव स्वीकारला असे सांगून निकालाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर अमेरिकन वृत्तपत्र असलेल्या वॉशिंग्टन पोस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. “भारत करोनाचा सरवाधिक फटका बसलेला देश ठरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारसभा घेऊन चुकीचा संदेश दिला. “देशाची कमजोर आरोग्य व्यवस्था करोनाच्या दुसऱ्या लाटेनं खिळखिळी केलेली असतानाच भारतात ४ राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात निवडणुका घेण्यात आल्या.याबद्दल त्यांच्यावर अनेक तज्ज्ञांनी टीका देखील केली आहे. पण नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला करावा लागलेला पराभवाचा सामना हा या करोना काळात मोदींचा जनाधार कमी झाल्याचंच सूचित करत आहे”, असं वॉशिंग्टन पोस्टने म्हटलं आहे. मद्रास उच्च न्यायालयाने देखील निवडणूक काळात झालेल्या रुग्णसंख्या विस्फोटाला निवडणूक आयोग जबाबदार असल्याची टिप्पणी केली होती”, असं वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या जागा मोठ्या प्रमाणावर वाढल्या असल्या, तरी अब की बार २०० पार मात्र भाजपाला जमलेलं नाही. पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचच सरकार येणार असल्यामुळे भाजपाच्या अनेक दिग्गजांनी केलेला प्रचार पक्षाच्या कामी न आल्याचंच दिसून येत आहे. तर तामिळनाडूमध्येही भाजपाला फारशी प्रगती करता आलेली नाही. त्यामुळे करोना काळात प्रचंड चर्चा आणि प्रचार झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला आसाम आणि पुद्दुचेरी स्वत:कडेच राखण्यावर समाधान मानावं लागलं आहे. “गेल्या महिन्याभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक मोठमोठ्या प्रचारसभा घेतल्या. या प्रचारसभांना पश्चिम बंगालमधल्या हजारो, लाखो लोकांनी उपस्थिती लावली होती. एक महिला नेतृत्व करत असलेल्या पक्षासोबत मोदींचा पक्ष असलेल्या भाजपाचा सामना होता. मोदी आणि त्यांचे गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये तब्बल ५० प्रचारसभा घेतल्या. पण संध्याकाळपर्यंत हे स्पष्ट झालं होतं की मोदींच्या पक्षाचा बंगालमध्ये पराभव झाला आहे. आणि दक्षिण भारतातल्या इतर दोन राज्यांमध्ये देखील भाजपा पराभवाच्या मार्गाला लागलं होतं”, असं देखील या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 3, 2021, 11:15 am- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY