West Bengal Election 2021 Result Live: ज्या पद्धतीने बंगालमध्ये जे चाललंय याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल! शरद पवार संतापले
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयाची हॅटट्रिक झाली असून पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचं स्पष्ट आहे. मात्र ममता बॅनर्जींचा मतदारसंघ नंदीग्राममध्ये चित्र अद्यापही स्पष्ट नाही. ममता बॅनर्जी यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर भाजपा सुवेंदू अधिकारी यांचा विजय झाल्याचा दावा केला.भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनी १६२२ मतांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला असं ट्विट भाजपा नेते अमित मालवीय यांनी केलं आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आय़ोगाने फेरमोजणी करण्याची मागणी केली आहे.
यावरून शरद पवार संतापले असून बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल! असे म्हटले आहे.
रडीचा डाव!
बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 2, 2021
दरम्यान , ममता बॅनर्जी म्हणाल्या , मी निकाल मान्य करते. पण निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात कोर्टात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
ममतांनी नंदीग्राममध्ये आपला सुवेंदू अधिकारींनी केलेला पराभव मान्य केला. आधी ममता दमत – भागत १२०० मतांनी जिंकल्याची बातमी एएनआय वृत्तसंस्थेने जाहीर केले होते.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 2, 2021, 8:56 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY