Breaking News

मोठी बातमी: कॉंग्रेस नेते, डहाणू मतदार संघाचे माजी खासदार दामू बारकू शिंगडा यांचे कोरोनामुळे आज निधन

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 2, 2021 7:47 pm
|

पालघर :काॅग्रेसचे जेष्ठ नेते व डहाणू मतदार संघाचे माजी खासदार दामू बारकू शिंगडा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.ते 68 वर्षांचे होते. वसई येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान आज (रविवार) सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. दामू बारकू शिंगडा हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.ते ठाणे जिल्हा व पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष होते. दामू शिंगडा हे पहिल्यांदा लहान वयात खासदार झाले त्या वेळे पासून आजतागायत गांधी घराण्याची एकनिष्ठ होते.

भारतीय काॅंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेल्या दामू शिंगडा यांनी १९७९ मध्ये प्रथम जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली.1980 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी ते खासदार म्हणून प्रथम डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर याच मतदारसंघातून ते 1984, 1989, 1991 व 2004 असे पाच वेळा निवडून आले. पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले शिंगडा हे गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जायचे. शेतीनिष्ठ शेतकरी म्हणूनही ते सर्वांना परिचित होते. त्यांनी अनेक वर्षे काॅंग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्षपदाची धुरा वाहिली होती. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर त्यांचे जवळचे संबंध असल्याने त्यांना अजात शत्रु म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी व नातवंडे असा परिवार आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 2, 2021, 7:47 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *