‘मी करेक्ट कार्यक्रम करतो, पण..’, पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पंढरपूर,: राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर घेण्यात आलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी (2 मे) निकाल जाहीर झाले. राष्ट्रवादीसह भाजपने येथील निवडणूक ही प्रतिष्ठेची केली होती. आता या निवडणुकांमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. 7500 मतांनी समाधान औताडे विजयी झाले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीकडून भालके यांचे पुत्र भगीरथ भालके रिंगणात उतरले तर भाजपने समाधान आवताडे यांना मैदानात उतरवले . ही पोट निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक केली होती. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत ‘तुम्ही भाजपच्या उमेदवाराला जास्त मत देऊन यांचा करेक्ट कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा कार्यक्रम करतो’ असं आवाहन केलं होतं. अखेर फडणवीसांच्या आवाहनाला पंढरपूरकारांनी हाक देत राष्ट्रवादीला आस्मान दाखवले.
या निकालानंतर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सडकून टीका केली. भाजपवर जनतेनं विश्वास दाखवला. त्यामुळे मी पंढरपूरच्या जनतेचं मनापासून आभार मानतो. गेल्या दीड वर्षातील महाविकास आघाडीच्या गैरप्रकाराला, भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला एकप्रकारे आरसा दाखवण्याचं काम पंढरपुरच्या जनतेना केलाय. हे सरकार आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत राज्य सरकारचे तीन पक्ष उतरले. साम-दाम-दंड-भेद अशा सगळ्या पद्धती अवलंबले. त्यांनी प्रशासनाचा गैर उपयोग केला. मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरउपयोग केला. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
फडणवीस म्हणाले “आम्हाला पंढरपुरात पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला. आमच्या टीमने खूप चांगलं काम केलं. भाजप एकत्रित काम करत होती. जनतेपर्यंत पोहोचून आम्ही जनतेची मत मिळवू शकलो. या सरकारने कोरोना काळात कोणाला मदत केली नाही. बारा बलुतेदारात नाराजी होती, वीज तोडली गेली त्यावरुन जनता नाराज होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला निवडलं”, असं मत त्यांनी मांडलं.
पुढे ते म्हणाले , बंगाल कम्युनिस्ट आणि काँग्रेसमुक्त झाला आहे. आता भगाव्याचं राज्य त्या ठिकाणी होत आहे. काँग्रेस म्हणजे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना अशी झाली आहे.“आम्हाला इतर राज्यांतही योग्य यश मिळालं आहे. बंगालमध्ये आम्हाला अपेक्षित जागा मिळाल्या नसल्या तरी चांगल्या जागा मिळाल्या नाही. शिवसेनेचा संबंध नाही, राष्ट्रवादी आज हरले, काँग्रेसला फटका पण ममता दीदी यशामुळे यांना इतका आनंद झालाय? या निवडणुकीत ममता यांना निवडून यायला दमछाक झाली हेही दिसलं”, असा टोला फडणवीसांनी लगावला.तर विजयानंतर या ‘करेक्ट कार्यक्रमा’ची देखील चांगलीच चर्चा सुरु आहे. ‘त्या वक्तव्यानंतर पुन्हा सत्ताबदलाच्या चर्चांना ऊत आला होता. मात्र 105 आमदारांमध्ये समाधान आवताडे यांची एकाची भर पडल्यानंतर हा ‘करेक्ट कार्यक्रम’ फडणवीस कसे करणार? असा सवाल केला जातोय. मात्र आवताडे यांच्या विजयानंतर फडणवीसांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आज पुन्हा फडणवीस यांनी योग्यवेळी सरकारचा कार्यक्रम करायचा आहे. पण आता लक्ष कोरोनावर आहे, असं म्हणत भाष्य केलं.
दरम्यान ,आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. टपाली मतदानात समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती. मधल्या काही फेरीत आवताडे हे मागे पडले होते. पण समाधान आवताडे यांनी नंतर आघाडी घेतली ती 36 व्या फेरीपर्यंत कायम राहिली.त्याआधी दुसऱ्या फेरीअखेरीस आवताडे 114 मतांनी पिछाडीवर होते. तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके 114 मतांनी आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरी अखेर आवताडेंना 5 हजार 492 मतं मिळाली होती. तर भगीरथ भालके यांना 5 हजार 606 मतं मिळाली. तिसऱ्या फेरीत 635 मतांनी भगीरथ भालके पुढे होते. भगीरथ भालके यांना 8613 मतं मिळाली. तर समाधान आवताडे यांना 7978 मतं मिळाली. पण, त्यानंतर डाव पलटला. 7 व्या फेरीपासून समाधान आवताडे यांनी जोरदार मुसंडी मारली आणि मोठी आघाडी मिळवली.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 2, 2021, 6:41 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY