Breaking News

बंगालमधील विजयानंतर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या …

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 2, 2021 5:31 pm
|

कोलकाता : आज पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर नंदीग्राम मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असलेल्या ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली आणि भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांचा १२०० मतांनी पराभव केला.

पश्चिम बंगालमधील विजयानंतर प्रथमच ममता बॅनर्जी म्हणाल्या की कोरोनावर नियंत्रण ठेवणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे. त्या म्हणाले की, आपण आत्ता विजयाचा उत्सव साजरा करणार नाही. त्याचबरोबर त्यांनी समर्थकांना आवाहन केले की कोठेही विजयी मिरवणूक काढू नये. तसेच बंगाल जय हो अशी घोषणा ही त्यांनी यावेळी दिली. ममता बॅनर्जी यांच्या पायाची दुखापतही बरी झाली आहे. म्हणूनच आपल्या संबोधनादरम्यान व्हीलचेअरवर उभी नसल्याचे दिसून आले.

दरम्यान , .पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, असम, पुदुच्चेरी विधानसभा निवडणूक निकाल मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरूवात झाली . पश्चिम ममता बॅनर्जीना पराभूत करण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले . हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या . त्यामुळे सर्वाधिक चुरस पश्चिम बंगालमध्ये असून राज्यात तृणमूल काँग्रेसची लाट कायम असून पुन्हा ममता बॅनर्जी विजयाची हॅटट्रिक झाली आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 2, 2021, 5:31 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *