पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंना पराभूत करुन भाजपचे समाधान आवताडे विजयी, 7500 मतांनी मिळवला दणदणीत विजय
पंढरपूर: राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर घेण्यात आलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी (2 मे) निकाल जाहीर झाले. राष्ट्रवादीसह भाजपने येथील निवडणूक ही प्रतिष्ठेची केली होती. आता या निवडणुकांमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. 7500 मतांनी समाधान औताडे विजयी झाले आहेत.
सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके हे आघाडीवर होते. मात्र काही फेऱ्यांनंतर भाजपचे उमेदवार यांनी समाधान आवताडे यांनी आपली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली आणि दणदणीत विजय मिळवला आहे.
विजयानंतर पंढरपुरात कोरोना नियम केराच्या टोपलीत टाकल्याचे दिसत आहे. भाजपकडून विजयोत्सव साजरा केला जात आहे. समाधान आवताडे यांची विजयी मिरवणूक काढलेल्याचे चित्र पंढरपुरात दिसत आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे येथे सध्या मतमोजणी केंद्रावर फक्त 14 टेबलच मांडण्यात आलेले होते. जमावबंदीचे आदेशही जारी करण्यात आले होते. मात्र विजयानंतर हे नियम पाळले नसल्याचे दिसत आहे.
30 वी फेरी
भाजप : समाधाव आवताडे : 89037
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 82127
27 वी फेरी
भाजप : समाधान आवताडे : 80557
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 73925
भाजप 6632 मतांनी आघाडीवर
26वी फेरी
भाजप : समाधान आवताडे : 77438
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 71121
भाजप 6317 मतांनी आघाडीवर
22 वी फेरी
भाजप – समाधान आवताडे : 64810
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 60864
अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0
अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10
20 वी फेरी
भाजप – समाधान आवताडे : 62056
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 58809
अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0
अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 2, 2021, 4:06 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY