चंद्रकांत पाटलांनी पंढरपुरातल्या ‘करेक्ट कार्यक्रमावर म्हटलं..
मुंबई: आज (२ मे) संपूर्ण देशात निवडणूकांच्या निकालाची रणधुमाळी आहे. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीसह देशात ५ राज्यांच्या निवडणुकांचे आज निकाल लागणार आहे. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याच पार्श्वभूमिवर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, पंढरपुरात आता निकालाचे चित्र हे जवळजवळ स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना मताधिक्याची अपेक्षा होती, त्याच भागात समाधान आवताडे यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे . त्यामुळे भाजपने मोठी आघाडी घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव निश्चित झाला आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून काम केल्यानेच हा विजय झाला आहे, ‘प्रशांत परिचारक, उमेश परिचारक आणि भाजपच्या इतर नेत्यांसह कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून काम केलं. कार्यकर्त्यांनी मतदारांनी मतदान करण्यासाठी जागृती केली. जनतेमध्ये महाविकास आघाडीबाबत असलेला रोष जनतेने व्यक्त केला आहे. त्यामुळेच भाजपचा हा विजय झाला असून मी दुसऱ्यांचे शब्द वापरत नाही पण करेक्ट कार्यक्रम केला आहे.’ असं म्हणत महाविकास आघाडीला चंद्रकांत पाटील यांनी लक्ष्य केलं.
तर पश्चिम बंगालच्या निवडणूका प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. “पश्चिम बंगालमध्ये भाजपाला पुरेसं संख्याबळ मिळालेलं नाही. लोकशाहीत निकाल मान्य करावे लागतात. येथे भाजपाला रोखण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले होते. भारतीय जनता पक्ष देशातील प्रभावी पक्ष आहे. बंगालमध्ये एकेकाळी निर्विवाद सत्ता राखणारे डावे आणि जास्त जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचे संख्याबळ मर्यादित राहिलेले दिसते. बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्यांनी तृणमूल काँग्रेससोबच अघोषित आघाडी केल्याचे दिसून आहे. काँग्रेस आणि डाव्यांनी आपली मते तृणमूलच्या पारड्यात टाकली, त्यामुळे देशात आता हे स्पष्ट झालं आहे की भाजपा विरुद्ध सगळे. त्यामुळे वाट्टेल ते करा पण भाजपाला पराभूत करा हाच फंडा पश्चिम बंगालमध्ये चालला”, असं ते म्हणाले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 2, 2021, 3:47 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY