Breaking News

संजय राऊतांचे भाकीत खरे ठरले, म्हणाले होते “पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना हरवणं सोपं नाही

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 2, 2021 2:04 pm
|

मुंबई : देशात पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. त्यापैकी अवघ्या देशाचे लक्ष प. बंगालच्या निकालाकडे आहे. येथे तृणमूल विरुद्ध भाजप अशी कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)यांचे सरकार येणार, त्यांना कोणीही रोखू शकत नाही, असे भाकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी काही वेळेपूर्वीच माध्यमांशी बोलताना व्यक्त केले होते. आता मात्र त्यांचं भाकीत खरे ठरले आहे. कारण पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालानुसार बंगालमध्ये सुरुवातीच्या तीन तासांमध्ये तृणमूल काँग्रेस 148 जागांवर बहुमताच्या आकड्यांना पार करुन (292 जागांच्या हिशोबाने 147) 192 जागांवर पोहोचल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने 192 जागांवर आघाडी घेतली आहे.

गेल्या महिनाभरापासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकालाबाबत संजय राऊत यांनी वेळोवेळी माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. भाजपने कितीही जोर लावला तरीही “पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना हरवणं सोपं नाही. दै. सामनातील आपल्या रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी अनेक राजकीय भाकिते केली आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या, तर हा मोदी-शहांचा वैयक्तिक पराभव ठरेल, भाजपासारख्या मोठ्या पक्षासोबत ममता बॅनर्जी या वाघिणीसारख्या लढत आहेत. त्यांच्या खरंच कौतुक करायला हवे असे राऊत म्हणाले होते. आता हाती आलेल्या निकालानुसार ममता बॅनर्जी यांच्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

तसंच संजय राऊत यांनी म्हटले की, पश्चिम बंगालच्या निकालानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ सुरू होईल, असे छातीठोकपणे सांगणारे लोक भेटतात तेव्हा आश्चर्य वाटते. पश्चिम बंगालच्या निकालांवर महाराष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे, असे जे सांगत असतात ते नक्की कोणत्या नंदनवनात वावरत आहेत? मात्र, अमित शाह पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर महाराष्ट्रात लक्ष घालतील, असे सांगितले जाते. एकतर पैशांचा किंवा बळाचा वापर करून आमदारांची फोडाफोडी केली जाईल. कोरोना स्थिती हाताळण्यात अपयश आले सांगून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाईल. देशात औषधे आणि ऑक्सिजनअभावी चिता पेटत असताना हे राजकीय खेळ कोणाला सुचतातच कसे, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 2, 2021, 2:04 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *