Breaking News

‘मी पुन्हा भारतात लवकरच परतणार ’; अदर पुनावालांनी दिला शब्द’

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 2, 2021 1:15 pm
|

लंडन : देशात कोरोना महामारीने दुसऱ्या लाटेत रौद्ररूप धारण केले आहे. सीरमचे प्रमुख अदर पुनावाला इंग्लंडमध्ये गेलेले आहेत. ब्रिटनला पोहोचल्यानंतर त्यांनी तेथील माध्यमाला मुलाखत देऊन धक्कादायक खुलासे केले. आता मात्र, भारतात लवकरच परतणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे. अदार पूनावाला म्हणाले, की “आमच्या पार्टनर्ससोबत ब्रिटनमध्ये झालेली मीटिंग यशस्वी ठरली आहे. पुण्यात कोव्हीशील्डच्या उत्पादनाचे काम जोरात सुरू आहे. मी लवकरच भारतात परतणार आहे. तेव्हा मी पुन्हा व्हॅक्सीनेशन उत्पादनाची पाहणी करणार आहे.”असं म्हटले आहे .

काय आहे प्रकरण

एकीकडे रुग्णसंख्येचे उच्चांक प्रस्थापित होत असताना दुसरीकडे लसीकरणही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. परंतु आता लसींचा तुटवडा असल्याचे जाणवत आहे. यावर उपाय म्हणून भारतातील प्रमुख लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट परदेशातही लसीचे उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात आहे. परंन्तु सीरमचे प्रमुख अदर पुनावाला इंग्लंडमध्ये गेलेले आहेत. ब्रिटनला पोहोचल्यानंतर त्यांनी तेथील माध्यमाला मुलाखत देऊन धक्कादायक खुलासे केले. अदर पुनावाला म्हणाले की, त्यांना देशातील श्रीमंत आणि बड्या राजकारण्यांकडून धमक्या मिळताहेत. मी जर खरे बोललो, तर माझे शीर कापले जाईल, अशी भीतीही त्यांना वाटते. यामुळेच कोरोना लसीचे उत्पादन त्यांना लंडनमध्ये करायचे आहे,. त्यांनी सहकुटुंब भारत सोडून ब्रिटनला जाण्याचे ठरवले अशी चर्चा सुरू आहे.

लंडनमधील ‘द टाइम्स’ने याबाबत सविस्तर बातमी दिली आहे. यानुसार, अदर पुनावाला यांनी त्यांना येणाऱ्या फोन कॉल्सबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सातत्याने येणारे फोन कॉल्स अत्यंत त्रासदायक असल्याचं ते म्हणाले. सर्व लोकांना वाटते की, लस सर्वप्रथम मला मिळावी. परंतु, लोकांनी अशाप्रकारे धमकी देणे समजण्यापलीकडे असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, भारत देशात माझ्यावर लस पुरवण्याबाबत प्रचंड दबाव आहे. लोक अशी अपेक्षा करतील असे वाटले नव्हते. त्यामुळे धमकी देणारा कोण? असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 2, 2021, 1:15 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *