Breaking News

देवेंद्र फडणवीसांबद्दलचं वक्तव्य भोवलं; 5 जणांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 2, 2021 12:43 pm
|

नाशिक :विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Devendra Fadnavis Viral Video) झाला आहे. या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या व्हिडिओ प्रकरणी नाशिक येथे पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच नाशिक जिल्हा दौऱ्यावर असतांना 30 एप्रिलला नाशिक महानगरपालिकेच्या बिटको (Bitco) कोविड रुग्णालयाला भेट देऊन तेथील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत गिरीश महाजन देखील होते. या दौऱ्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या सोशल डिस्टंन्सींगवरुन (Social Distancing) काही कमेंट्स करण्यात आल्या होत्या. या कमेंट्सवरुनच ही तक्रार करण्यात आल्याचे समजते. सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) असलेल्या या व्हिडिओमध्ये कमेंटही पाहायला मिळत असल्याचे सांगितले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी करणाऱ्यांवर पोलिसांनी दोन दिवसात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर काही नेत्यांबाबत आक्षेपार्ह उल्लेख होत असल्याचे पाहायला मिळत होते. त्याविरोधात भाजप नेत्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दिल्याचेही पाहायला मिळाले होते.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 2, 2021, 12:43 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *