Breaking News

बंगालमध्ये तृणमूलची हॅट्रिक, मात्र स्वतः ममता नंदीग्राममधून पिछाडीवर तर भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी सात हजार मतांनी पुढे

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 2, 2021 11:43 am
|

नंदिग्राम : कोरोनाच्या विक्रमी प्रकरणांदरम्यान 62 दिवस सुरू चाललेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर अखेर आज पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. 5 राज्यांपैकी सर्वात जास्त उत्सुकता ही बंगालची आहे.

अडीच तासाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये राज्यात टीएमसी आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. येथील सर्वात चुरशीची जागा नंदीग्राम मतदारसंघातील आहे. येथून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना एकेकाळचे त्यांचे सोबती शुभेंदू अधिकारींचे आव्हान आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार सकाळी 10.30 पर्यंत शुभेंदू अधिकारी 7287 मतांनी या जागेवर आघाडीवर होते. त्याचवेळी ममता बॅनर्जी 5790 मतांच्या तुलनेत खूपच मागे आहेत.दरम्यान सुरुवातीच्या कलांमध्ये तृणमूलला स्पष्ट बहुमत असल्याचे दिसत आहे. मात्र नंदीग्राम जागेवर ममता बॅनर्जी भाजपच्या शुभेंदु अधिकारींपेक्षा पिछाडीवर आहेत.

बंगालमध्ये सुरुवातीच्या तीन तासांमध्ये तृणमूल काँग्रेस 148 जागांवर बहुमताच्या आकड्यांना पार करुन (292 जागांच्या हिशोबाने 147) 192 जागांवर पोहोचल्या आहेत. खरेतर हा आकडा 2016 मध्ये तृणमूलच्या विजयी जागांपेक्षा कमी आहे. दुसरीकडे सुरुवातीच्या कलांमध्ये ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये भआजपच्या शुभेंदु अधिकारींपेक्षा 7 हजार मतांनी पिछाडीवर दिसत आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधी शुभेंदू अधिकारी टीएमसी सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते. 2016च्या निवडणुकीत शुभेंदू अधिकारी यांनी या जागेवर डाव्या उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 2, 2021, 11:43 am
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *