Pandharpur Elections 2021: दहाव्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे यांचे पारडे वर
पंढरपूर : देशात 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपला टफ फाईट देऊन ममता बॅनर्जी पुढे जात आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर घेण्यात आलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी (2 मे) निकाल लागणार आहे. राष्ट्रवादीसह भाजपने येथील निवडणूक ही प्रतिष्ठेची केली आहे. आता या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादी – भाजप उमेदवारांचे पारडे सारखे खाली – वर होत आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे 2397 मताने आघाडी आहेत.दहाव्या फेरीत 1838 मतांनी समाधान आवताडे आघाडीवर आहेत . नवव्या फेरी अखेर भाजप उमेदवार समाधान आवताडे हे 2397 मताने आघाडी आहे. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर असताना चौथ्या फेरीत भगीरथ भालकेंनी आघाडी घेतली .
कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे येथे सध्या मतमोजणी केंद्रावर फक्त 14 टेबलच मांडण्यात आलेले आहे. यामुळेच मतमोजणी थोडी संथ गतीने होऊ शकते. यामुळे निकाल येण्यास उशीर होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अंतिम निकाल येण्यासाठी रात्रीचे 9 ते 10 वाजण्याची शक्यता आहे.
दरम्यान आज निवडणुकींच्या निकालानंतर विजयी मिरवणूक निघण्याची शक्यता असते म्हणून खबरदारी म्हणून प्रशासनाने पहिलेच जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात जमावबंदीचा आदेश दिले आहे. यासोबतच घराबाहेर फिरुन मतमोजणीचा निकाल ऐकता येणार नाही. निकाल घरात बसून आकाशवाणी तसेच voter helpline app या माध्यमातून जाणून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कोरोना काळतही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने येथे मोठ्या प्रमाणात प्रचारसभा घेऊन आपला जोर लावला आहे. दोघांनाही विजयाची अपेक्षा आहे. यामुळे आता ही जागा कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पहिली फेरी
समाधान अवताडे – २ हजार ८४४
भगीरथ भालके – २ हजार ४९४
आघाडी – अवताडे (४५० मतं)
दुसरी फेरी
समाधान अवताडे – २ हजार ६४८
भगीरथ भालके – ३ हजार ११२
आघाडी – भालके (५०० हून आधिक)
तिसऱ्या फेरीनंतरची एकूण मतं
समाधान अवताडे – ७ हजार ९७८
भगीरथ भालके – ८ हजार ६१३
आघाडी – भालके (६३५ मतं)
चौथी फेरी
समाधान अवताडे – ३ हजार ३२५ (एकूण मतं – ११ हजार ३०३)
भगीरथ भालके – ३ हजार ३२८ (एकूण मतं – ११ हजार ९४१)
आघाडी – भालके (६३८ मतं)
पाचवी फेरी
समाधान अवताडे – २ हजार ७५६ (एकूण मतं – १४ हजार ५९)
भगीरथ भालके – २ हजार ७७६ (एकूण मतं – १४ हजार ७१७)
आघाडी – भालके (७०० हून अधिक)
सहावी फेरी
समाधान अवताडे – ३ हजार १५९ (एकूण मतं – १७ हजार २१८)
भगीरथ भालके – २ हजार ६९५ (एकूण मतं – १७ हजार ४१२)
आघाडी – भालके (१९४ मतांनी)
सातवी फेरी
समाधान अवताडे – २ हजार ९९५ (एकूण मतं – २० हजार २१३)
भगीरथ भालके – १ हजार ९६८ (एकूण मतं – १९ हजार ३८०)
आघाडी – अवताडे (८३३ मतांनी)
आठवी फेरी
समाधान अवताडे – ३ हजार २८७ (एकूण मतं – २३ हजार ५००)
भगीरथ भालके – १ हजार ९५४ (एकूण मतं – २१ हजार ३३४)
आघाडी – अवताडे (२ हजारांहून अधिक मतांनी)
नववी फेरी
समाधान अवताडे – २ हजार ७५५ (एकूण मतं – २६ हजार २५५)
भगीरथ भालके – २ हजार ६९३ (एकूण मतं – २४ हजार २७)
आघाडी – अवताडे (२ हजार २०० हून अधिक मतांनी)
दहावी फेरी
समाधान अवताडे – २ हजार ५२१ (एकूण मतं – २८ हजार ७७६)
भगीरथ भालके – ३ हजार १०६ (एकूण मतं – २७ हजार १३३)
आघाडी – अवताडे (१ हजार ६०० हून अधिक मतांनी)
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 2, 2021, 11:14 am- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY