Breaking News

ठाण्यातील कोरोनाबाधितांचा ऑक्सिजन अभावी नव्हेतर “यामुळे” झाला मृत्यू , महत्वाची माहिती समोर

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 1, 2021 7:44 pm
|

ठाणे : ठाण्यातील (Thane) वर्तकनगर (Vartak Nagar) येथील वेदांत रुग्णालयात (Vedant Hospital) गेल्या आठवड्यात 5 करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली होती. ऑक्सिजन अभावी या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केले होते. मात्र, रुग्णालयाने हे आरोप फेटाळले होते. या रुग्णांच्या मृत्युनंतर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकाचे (Bhiwandi-Nizampura Municipal Corporation) आयुक्त डॉ. पंकज आशिया (Pankaj Ashiya) यांच्या अध्यक्षतेखालील समितीची सखोल चौकशी करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान, समितीने रुग्णांचे निदान आणि त्यांच्या उपचारांशी संबंधित संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. याचबरोबर मृतांचे नातेवाईक, डॉक्टर, परिचारिका, आणि पुरवठा व्यवस्थापित करणारे कर्मचारी आणि आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या इतर रूग्णांची चौकशी केली. त्यानुसार, या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी नव्हेतर, निमोनियामुळे आणि त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे झाला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

या प्रकरणी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयास भेट देऊन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भिवंडीचे आयुक्त डॉ. पंकज अशिया यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांच्या समितीची नियुक्ती केली होती. या समितीकडून या प्रकरणाची चौकशी करून प्रकरणाचा सविस्तर अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 1, 2021, 7:44 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *