आनंदवार्ता! कोरोनाविरूद्ध लढाईत देशाला मिळाले तिसरे शस्त्र ,रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप अखेर भारतात दाखल
हैदराबाद: नवी दिल्ली – कोरोनाबाधितांची देशात संख्या वाढत असताना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद विमानतळावर रशियातून स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप पोहोचली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. आजपासून देशात १८ वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. पण लसींचा तुटवडा काही ठिकाणी जाणवत असल्यामुळे अडथळे येत आहे. अशातच स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप भारतात दाखल झाल्यामुळे येत्या काळात लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे.
भारतात रशियन लस स्पुटनिक व्ही वैक्सीनची पहिली तुकडी पोहोचली आहे. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास दीड लाख डोस घेऊन रशियन विमान हैदराबादमध्ये दाखल झाले. यामुळे , देशाला कोरोनाविरूद्ध लढाईत तिसरे शस्त्र मिळाले आहे. आज, देशात लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे, जो स्पुटनिक व्हीच्या आगमनाने आता वेगवान होईल.
#video आनंदवार्ता! रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप अखेर भारतात दाखल#coronavirus #COVID19 pic.twitter.com/zqPOmdo8sw
— Kaaltarang News Marathi (@kaaltarangnews) May 1, 2021
कोरोनाविरूद्धच्या लढाईत सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस सध्या भारतात वापरली जात आहे. . आतापासून, 18 वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली गेली आहे. स्पुटनिक व्हीसोबत भारतामध्ये तिसरी लस उपलब्ध झाली आहे स्पुटनिक -व्हीची पहिली तुकडी या मोहिमेस गती देईल. रशियन लसीच्या आपत्कालीन वापरास भारताने नुकतीच 12 एप्रिल रोजी मान्यता दिली. भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. स्पुटनिक व्ही लसीची परिमामकारकता ९२ टक्के असल्याचे सांगण्यात येत आहे.
हैदराबाद: भारत में बढ़ते कोरोना संक्रमण के बीच रूस ने भारत को मदद के लिए स्पूतनिक-V वैक्सीन की पहली खेप भेजी है। #COVID19 pic.twitter.com/mh2UdKOcND
— ANI_HindiNews (@AHindinews) May 1, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 1, 2021, 5:16 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY