…अन्यथा देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहील- संजय राऊत
मुंबई : सद्याच्या परिस्थितीत सगळ्यांनी एकत्र येऊन राजकारणविरहीत काम केलं तरच हा देश वाचेल. अन्यथा देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहील, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तसेच कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय समिती स्थापन करावी. या समितीच्या माध्यमातूनच कोरोनाची परिस्थिती हाताळली जावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले,”सर्वोच्च न्यायालय सक्रिय झालं आहे. ही चांगली गोष्ट आहे. हे थोडं आधी व्हायला पाहिजे होतं. आज अनेक राज्यांची परिस्थिती हातबाहेर गेली आहे. न्यायालयाने फटकारलं आहे,पण फटकारून काय करणार?,” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
“राष्ट्रीय स्तरावर आपत्ती आहे. केंद्र सरकार त्याकडे गांभीर्याने पाहत नसेल वा त्यांचंही नियंत्रण सुटलं आहे. हा राष्ट्रीय प्रश्न समजून सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्तरावर एक समिती नियुक्त केली पाहिजे.
त्या समिती यावर काम करेल म्हणजे कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही. केंद्राकडून याचं नियंत्रण होणं गरजेचं आहे. राजकारणविरहीत काम केलं, तरच हा देश वाचेल नाहीतर या देशामध्ये फक्त मुडद्यांचं राज्य राहिलं,” असं इशारा राऊत यांनी या वेळी दिला.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 1, 2021, 4:55 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY