एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही
मुंबई : देशासह राज्यातील कोरोना व्हायरसचं (Coronavirus) संकट अत्यंत गंभीर झालं आहे. कोरोना रुग्णवाढ, मृतांचा आकडा आणि डळमळीत झालेली आरोग्य व्यवस्था यामुळे चिंताजनक वातावरण निर्माण झालं आहे. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या धोरणावरही टीका केली. ते म्हणाले की, ‘केंद्रातील मोदी सरकारने कोरोनाची परिस्थिती अत्यंत निष्काळजीपणे हाताळली, सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे देशाची झालेली स्थिती पाहून सुप्रीम कोर्टानेही, “देशाच्या जनतेला मरायला सोडलं आहे का”?, असा संतप्त सवाल केला. अनेक गावं स्मशान झाल्याचे विदारक चित्र दिसत आहे. आतापर्यंत मोठे नुकसान झाले आहे. सध्यातरी लसीकरण हाच यावरील प्रभावी उपाय ठरत आहे. पण केंद्र सरकारने आपल्या देशातील लस दुसऱ्या देशांना पाठवली. ज्या पाकिस्तानला नेहमी शिव्या देता त्यांनाही ४.५ कोटी लसी दिल्या. एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही.’ असा खरमरीत टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लगावला.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी गरीब कुटुंबांना दत्तक घेऊन स्वतःचा व त्यांच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा !: मा. नाना पटोले
नोंदणीपासून लस मिळेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत काँग्रेस कार्यकर्ते लोकांना मदत करणार.
काँग्रेस मुख्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न pic.twitter.com/WEOdk11kTB
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 1, 2021
महाराष्ट्र दिनानिमित्त प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर येथे नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, कोरोना हे देशावर आणि राज्यावर आलेले अभूतपूर्व संकट आहे. दररोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या पहावत नाही. या संकटाचा सामना महाराष्ट्र विकास आघाडी सरकार वर्षभरापासून मोठ्या धैर्याने करत असून केंद्र सरकारने आपली जबाबदारी झटकली असली तरी महाराष्ट्र सरकारने मात्र जनतेला वाऱ्यावर न सोडता १८ वर्षावरील सर्वांच्या मोफत लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.. परंतु राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता मदतीचा ओघ वाढला पाहिजे. लसीकरणाचा खर्च मोठा आहे त्याला हातभार म्हणून काँग्रेस कार्यकर्ते आपल्या परिसरातील गरीब कुटुंबांना दत्तक घेऊन स्वतःच्या व त्या कुटुंबाच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. या सोबतच नोंदणी करून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत काँग्रेस कार्यकर्ते लोकांना मदत करणार आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 1, 2021, 3:21 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY