गुजरातमधील कोव्हिड सेंटरला आग;18 जणांचा होरपळून मृत्यू
भरुच (गुजरात) : शुक्रवारी रात्री गुजरातमधील भरुचमधील पटेल वेलफेयर कोविड रुग्णालयात भीषण आग लागली. या अपघातात 16 रुग्णांसह 18 जणांचा मृत्यू झाला. यात दोन स्टाफ नर्सचा मृतांमध्ये समावेश आहे. उर्वरित रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटल, सेवाश्रम हॉस्पिटल आणि जंबूसर अल मेहमूद हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. काही लोकांची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात यापूर्वी अशा घटना घडल्या होत्या. रात्री साडेबाराच्या सुमारास कोव्हिड सेंटरला ही आग लागल्याचं समोर आलं आहे.
भरुच जिल्ह्यातील पटेल वेलफेअर रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर बनवण्यात आलं होतं. तिथेच रात्रीच्या सुमारास मोठी आग लागली. आगीमुळे रुग्णालय व परिसरातील वीज बंद पडली. यामुळे बचावकार्यातही अनेक अडचणी निर्माण झाल्या. बर्याच प्रयत्नांनंतर रुग्णांना बाहेर काढले गेले व दुसर्या रुग्णालयात हलवण्यात आले. नवीन रुग्ण आल्यावर बराच काळ बेड्स आणि ऑक्सिजनसाठी प्रतिक्षा करत होते.
Gujarat| Fire breaks out at a COVID-19 care centre in Bharuch. Affected patients are being shifted to nearby hospitals. Details awaited. pic.twitter.com/pq88J0eRXY
— ANI (@ANI) April 30, 2021
आग लागताच अग्निशमन दलाची 12 वाहने व 40 रुग्णवाहिका बोलावण्यात आले. रुग्णांचे कुटुंबीयही घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी रुग्णालयाच्या आजुबाजूला सुमारे 5 ते 6 हजार लोकांची गर्दी होती. ते ओरडत होते आणि सगळीकडे गोंधळ सुरू होता. काही लोक ओरडत होते आणि सोशल मीडियावर मदतीसाठी याचना करत होते. अग्निशमन विभागाने बरीच मेहनत घेतल्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. 58 जणांवर उपचार सुरू होते. आयसीयू वॉर्डात 27 रूग्ण होते. या घटनेत 18 जण ठार झाले असून ज्यात 16 रुग्ण आणि 2 कर्मचारी होते. मात्र मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रुग्णालयातील रूग्णांना सिव्हिल हॉस्पिटल, सेवाश्रम हॉस्पिटल, जंबूसर अल महमूद यांच्यासह भरुचमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, परंतु ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी शोक व्यक्त केला असून मृत डॉक्टर, रुग्ण यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 1, 2021, 3:04 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY