Breaking News

दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांना कोरोना विषाणूची लागण; ट्विटरवर दिली माहिती;दिल्लीचा कारभार होम आयोसेलेशनमधून पाहणार

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 30, 2021 4:17 pm
|

नवी दिल्ली : कोरोनामुळे दिल्लीत हाहाकार उडालेला आहे. आता उपराज्यपाल अनिल बैजल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोविड-19 चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यावर उपराज्यपालांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. उपराज्यपाल यांनी स्वत:हून ट्विट करून ही माहिती दिली आहे.

बैजल यांनी ट्वीट केले की, “सौम्य लक्षणांसह आज माझी कोविड टेस्ट सकारात्मक आली आहे. लक्षणे सुरू झाल्यापासून मी स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे. माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्यावी. यादरम्यान मी माझ्या घरातून काम करत असताना दिल्लीत होत असलेल्या कामांची लक्ष ठेवणार आहे.”

दरम्यान, उपराज्यपाल बैजल दिल्लीमध्ये कोविड-19 विरुद्ध सुरू असलेल्या लढ्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. गुरुवारी मुख्य सचिव विजय देव यांच्याकडे त्यांनी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरणासाठी दिल्लीतील तयारीविषयी अहवाल मागविला. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (सुधारणा) कायदा २०२१ अस्तित्वात आल्यानंतर हे त्यांचे पहिले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या कायद्यानुसार दिल्लीतील ‘सरकार’ म्हणजे उपराज्यपाल आहेत. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या कायद्यातील तरतुदी 27 एप्रिलपासून लागू आहेत.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 30, 2021, 4:17 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *