Breaking News

“महाराष्ट्रात १ मेपासून लसीकरण सुरू होऊ शकेल, पण…” राजेश टोपेंनी केले सूतोवाच!

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 30, 2021 3:42 pm
|

मुंबई : १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अगदी प्राथमिक स्वरूपात निवडक लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातल्या काही नागरिकांना लस देता येऊ शकेल. पण नोंदणी करून ज्यांना लसीकरणासाठी अपॉइंटमेंट मिळेल, त्यांनीच संबंधित केंद्रावर जायला हवं. सुरुवातीला जिल्ह्यात एखादं केंद्र असू शकेल. त्यामुळे ज्यांची नोंदणी होईल, त्यांनीच केंद्रावर जावं. लस अतिशय नाममात्र स्वरूपात आहे”, असं राजेश टोपेंनी नमूद केलं.

“मे महिन्यात १३ ते १४ लाख लसीचे डोस देऊ, असे सिरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केले आहे. भारत बायोटेक कोवॅक्सिनचे ४ ते ४.५ लाख डोस देऊ शकेल. यादृष्टीने १८ ते ४४ वयोगटासाठी कमी केंद्रांवर लसीकरण सुरू करणार. पण एक नक्की आहे की केंद्र खूप कमी ठेवले, तर जास्त कालावधीसाठी लसीकरण सुरू राहील.” असे राजेश टोपे म्हणाले.

दरम्यान, नुकतेच लसींचे डोस अपुरे आहेत आणि नव्या डोसचा पुरवठादेखील पुरेसा नाही. यामुळे १ मे पासून राज्यात १८ ते ४४ वयोगटामध्ये लसीकरण सुरू होणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले. मात्र, आज राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी १ मे पासून राज्यात प्राथमिक स्तरावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 30, 2021, 3:42 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *