मराठमोळे बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे कोरोनामुळे निधन
मुंबई : मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारे मराठमोळे बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे. ते अवघ्या ३४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर बॉडीबिल्डर विश्वातून दु:ख व्यक्त केले जात आहे. नवी मुंबईत जगदीश लाड राहत होता. बॉडीबिल्डींग क्षेत्रात आपले नाव कमावत त्यांनी बडोद्याला व्यवसाय सुरु केला होता. त्य़ांनी स्वत;चा मालकीची जिम सुरु केली होती. या जिमच्या कामानिमित्त जगदीश थोडे दिवस बडोद्याला स्थायिक झाला होते. परंतु येथेच त्यांना कोरोनाने गाठले आणि त्यांचे निधन झाले.
लाड याने मिस्टर इंडियाचा दोन वेळा किताब ही जिंकला होता. त्याचसोबत कमी वयातच त्याने बॉडीबिल्डिंगमध्ये आपली कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याचसोबत नवी मुंबईत महापौर श्रीचा किताब सुद्धा पटकावला होता. तर मुंबईत पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक मिळवले होते.
दरम्यान, जर तुम्ही सुद्धा स्वत:ला फिट समजत असाल तरीही सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत काळजी घ्या. अन्यथा ही परिस्थिती तुमच्या जीवावर बेतू शकते. या व्यतिरिक्त नागरिकांनी सुद्धा काळजी घेण्यासह नियमांचे पालन करावे अशा सुचना दिल्या आहेत. तर महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट महिन्यात येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 30, 2021, 2:22 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY