Breaking News

‘रिझाइन मोदी’ हॅशटॅग ब्लॉक करायला आम्ही फेसबुकला सांगितलं नाही; केंद्राचे स्पष्टीकरण

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 30, 2021 12:55 pm
|

नवी दिल्ली : करोनाचे संकट सरकार ज्याप्रकारे हाताळत आहे, त्यावर वाढती टीका होत असतानाच काही दिवसांपूर्वी फेसबुकवर #ResignModi (मोदी राजीनामा द्या) हा ट्रेंड प्रचंड चालला. हा मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकला (Facebook) काढून टाकण्यास केंद्र सरकारने सांगितले नाही, असा खुलासा मोदी सरकारने केला आहे. कोरोना संसर्ग वाढू लागल्यानंतर त्याचे प्रतिबिंब सोशल मीडियावर उमटू लागले. #ResignModi हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड झाल्यानंतर तो ब्लॉक करणे हा सार्वजनिक असंतोषावर नियंत्रण मिळवण्याचा एक प्रयत्न होता, असा आरोप अमेरिकन ‘वॉल स्ट्रीट जर्नल’कडून (The Wall Street Journal) करण्यात आला होता.

यावर केंद्र सरकारने म्हटले आहे की, हा आरोप संपूर्णत: भ्रामक आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’नं ५ मार्च रोजी प्रकाशित केलेली बातमी संपूर्णत: बनावट आणि ‘निर्मित’ आहे. सरकारकडून हा हॅशटॅग हटवण्याचे निर्देश देण्यात आले नव्हते. फेसबुकनंही हे स्पष्ट केलंय की हा हॅशटॅग चुकीनं हटवण्यात आला होता, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

दरम्यान , भारताने फेसबुक, व्हॉटसअप आणि ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना तुरुंगात धाडण्याची धमकी दिली, अशा मथळ्याखाली ‘वॉल स्ट्रीट जर्नल’नं ५ मार्च २०२१ रोजी एक बातमी प्रसिद्ध केली होती. सरकारकडून या संपूर्णत: ‘खोट्या’ आणि ‘रचित’ माहितीवर आधारीत बातमीसंबंधी वॉल स्ट्रीट जर्नलला अधिकृतरित्या सूचित करण्यात आले होते, असे सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारने याबाबत जारी केलल्या निवेदनात म्हटले आहे की, आमचे करोना योद्धे आणि वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रयत्न समोर आणण्यात मीडिया महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अशा संवेदनशील प्रसंगी कोट्यवधी सामान्य भारतीयांशी जोडून सर्व जण या महामारीविरोधात एकत्र उभे राहू असे आवाहन आम्ही मीडियाला करत आहोत.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 30, 2021, 12:55 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *