Breaking News

अवकाळी पावसाने कोल्हापूर, सांगलीला झोडपले

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 30, 2021 11:30 am
|

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उकाडय़ाने सर्वजण त्रस्त आहेत. तर गेल्या दोन-तीन दिवसांपासून ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता. कागल तालुक्यातील गावांत बर्फवृष्टीप्रमाणे गारांचा वर्षाव झाल्यामुळे सर्वत्र गारांचा खच पडल्याचे दिसून आले तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला गुरुवारी सायंकाळी वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटात आलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. कोल्हापूर शहरात तुफान गारा बरसल्या. या पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. कागल तालुक्यातील गावांत बर्फवृष्टीप्रमाणे गारांचा वर्षाव झाल्यामुळे सर्वत्र गारांचा खच पडल्याचे दिसून आले होते.

वाळवा तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. केळी, पपईच्या बागा आणि ग्रीन हाउसचे प्रचंड नुकसान झाले. तसेच, विजेचा खेळखंडोबा झाला होता. पुणे-बंगळुरू महामार्गालगतची झाडे पडली. सांगली जिह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी अचानक ढगांची गर्दी झाली. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. सांगलीत हलक्या सरी कोसळल्या. जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 30, 2021, 11:30 am
Tags: Tags: , , ,
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *