Breaking News

ब्रेक द चेन: 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढला, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 30, 2021 11:13 am
|

राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंध १ मेपर्यंत होते. मात्र आता त्याला मुदतवाढ देण्यात आली असून हे निर्बंध आता १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीने गुरुवारी सायंकाळी हे आदेश जाहीर करण्यात आले. लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या निर्णयाबाबत घोषणा करतील. दरम्यान, राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध यापुढेही कायम ठेवण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. ही भीषण स्थिती लक्षात घेऊन १३ एप्रिल रोजी एक आदेश जारी करत कठोर निर्बंध लादण्यात आले होते. त्यानंतर गर्दी कमी होत नसल्याने २१ एप्रिल रोजी सुधारित आदेश काढत अत्यावश्यक सेवा वगळता निर्बंध अधिक कठोर करण्यात आले होते. हे निर्बंध १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार होते.

महाराष्ट्र सरकारने यापूर्वी मिनी लॉकडाऊनची घोषणा केली होती, परंतु त्याचे उल्लंघन होत असताना सरकारने 22 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले. हे लॉकडाऊन 1 मे पर्यंत सुरू राहणार असल्याचे महाराष्ट्र सरकारने सांगितले. परंतु आता लॉकडाऊनमध्ये पुन्हा 15 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रात काल (28 एप्रिल) 63 हजार 309 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर नव्या 61 हजार 181 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण 37 लाख 30 हजार 729 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 73 हजार 481 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.4% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 30, 2021, 11:13 am
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *