कठीण काळात मदतीला पुढे सरसावले मनसे नेते बाळा नांदगावकर, माजी आमदार म्हणून मिळणारं मानधन देणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
मुंबई : मनसे नेते बाळा नांदगावकर कोरोनामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी कोरोनाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीमध्ये माजी आमदार म्हणून मिळणारं मानधन कोव्हीड-१९ उपाययोजनेच्या खर्चासाठी दान केले आहे आणि या संकटाच्या काळात सरकारला मदत करावी, असे आवाहनही केले आहे. यासंदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर केले आहे.
बाळा नांदगावकर यांचे पत्र
सध्या संपूर्ण महाराष्ट्र मुंबई शहरात covid-19 च्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे व या त्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने होत आहे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या संख्येचे प्रमाण वाढत असून त्याकरिता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय सुविधा जसे इंजेक्शन , ऑक्सीजन अपुऱ्या पडत आहेत. तसेच एक मे 20२१ पासून 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे . त्यामुळे महाराष्ट्र शासना वरील खर्चाचा बोजा वाढला असून सध्याच्या लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती मुळे शासनाच्या उत्पादनात घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर एक जबाबदार लोकप्रतिनिधी माजी आमदार व माजी गृहराज्यमंत्री तसेच समाजाप्रती असलेली बांधिलकी म्हणून मला मिळणारे माहे एप्रिल 2019 चे मानधन covid-19 च्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात यावे व तसे आदेश संबंधितांना द्यावे ही विनंती . माझी अशी ही विनंती आहे की राज्यातील सर्व आजी माजी आमदार व खासदारांसह महाराष्ट्रातील सर्वच लोकप्रतिनिधींनी आपले मानधन( वेतन जे आपणास मिळते) ते ते सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस द्यावे. याकरिता शासन स्तरावरून आव्हान व विनंती करण्यात यावी. तसेच महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी देखील या कठीण काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सहकार्य करणे काळाची गरज आहे असे बाळा नांदगावकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
माजी आमदार म्हणून मिळणारं मानधन कोव्हीड-१९ उपाययोजनेच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलं; माजी आमदार-गृहराज्यमंत्री, मनसे नेते @BalaNandgaonkar ह्यांचं कौतुकास्पद सौजन्य. pic.twitter.com/qRRrFnUIEd
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 28, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 28, 2021, 6:07 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY