Breaking News

मोठा अनर्थ टळला…! परभणीत झाली असती नाशिकची पुनरावृत्ती

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 28, 2021 4:58 pm
|

परभणी : नाशिकसारखीच घटना परभणीत घडणार असती, मात्र सुदैवाने प्रसंगावधान राखत वेळीच उपाययोजना केल्यानं मोठी दुर्घटना टळल्याने अनेकांचे जीव वाचले आहेत. दरम्यान, ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवर रात्री साडे अकराच्या सुमारास झाडाची फांदी पडल्याने ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याचा गंभीर प्रकार घडला. सदर घटना मंगळवारी २७ एप्रिल रोजी परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना घडला.

सदर घटना अशी घडली की, परभणीतील ही पाईपलाईन उघड्यावर असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना रूग्णांना ऑक्सिजन पुरवणारी पुरवण्यासाठी सदर पाईपलाईनचा उपयोग केला जात आहे. रात्री अचानकपणे वादळीवारा आणि विजांचा कडकडाट सुरू होता. वादळीवाऱ्यामुळे जिल्हा सरकारी रुग्णालयातील निलगिरीच्या एका झाडाची फांदी या उघड्या पाईपवर पडली. फांदी मोठी असल्यामुळे तो पाईप खाली कोसळला आणि पाईपलाईन मधून ऑक्सिजनची गळती सुरू झाली. सदर घटना घडत असताना तिथे उपस्थित असलेले शंकर नाईकनवरे यांनी तातडीने खासदार संजय जाधव यांना सदर घटना कळवली. आणि काही वेळातच खासदारसंजय जाधव,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख , जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. देशमुख यांनी यावेळी घडलेला प्रकार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही मोबाईल वरून कळवला. त्यांच्याच मोबाईलवरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संवाद साधला आणि जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना निवासी उपजिल्हाधिकारी महेश वाडकर, मनपा आयुक्त देविदास पवार, अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर हे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीला गळती लागल्याने २४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशीच घटना पुन्हा घडू नये म्हणून सर्व ठिकाणी काळजी घेतली जात आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 28, 2021, 4:58 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *