पालघर – मनोर जड-अवजड वाहतूक बंद, पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यासाठी अधिसूचना जारी
पालघर :- कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, ठाणे यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 160 अ, सिन्नर-घोटी-त्रिंबकेश्वर-मोखाडा-जव्हार-मनोर-पालघर रस्ता कि.मी. 197/200 ते 217/700 या रस्त्याचे मजबूतीकरण करणेसाठी मनोर गावातून जाणारी जड वाहतुक इतर मार्गाने वळविन्यासाठी वाहतूक अधिसूचना जारी करण्यात आली आहे.अपर जिल्हादंडाधिकारी पालघर, डॉ. किरण महाजन यांनी ही अधिसूचना जारी केली आहे.
वाहतूकीकरीता बंद करण्यात येणारा मार्ग
राष्ट्रीय महामार्ग क्र. 160 अ. सिन्नर-घोटी त्रिंबकेश्वर-मोखाडा जव्हार- मनोर- पालघर रस्ता कि.मी. 197/200 ते 217/700 या रस्त्याचे मजबूतीकरण करणेसाठी पालघर तालुक्यातील मनोर गावातून जड-अवजड वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे.
वाहतूकीकरीता रस्ता बंद करण्याचा कालावधी बुधवार दि. 28/04/2021 रोजी पासून ते गुरुवार दि. 27/05/2021 पर्यंत.
वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग
1) जड अवजड वाहने शिवाजी चौक (पालघर) बोईसर चिल्हार फाटा (रा.म.क्र.8) मार्गे ये-जा करतील.
2) जड अवजड वाहने शिवाजी चौक (पालघर) चहाडे नाका वरई नाका(रा.म.क्र.8) मार्गे ये-जा करतील.
उपरोक्त मार्गावर बुधवार दि. 28/04/2021 रोजी पासून ते गुरुवार दि. 27/05/2021 पर्यंत सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांस प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदरची वाहतुक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, महसूल विभागाची वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलिसांनी परवानगी दिलेली वाहने, उपविभागीय दंडाधिकारी व तालुका दंडाधिकारी यांनी परवानगी दिलेली वाहने तसेच राष्ट्रीय महामार्ग विभाग, ठाणे यांनी परवानगी दिलेल्या वाहनांना अधिसूचना लागू राहणार नाही.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 27, 2021, 8:49 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY