ब्रेट लीचा ऑक्सिजनपुरवठ्यासाठी मदतीचा हात , दिले ४१ लाख रूपये ,म्हणाला – भारत हे माझे दुसरे घर , लोकांचे वेदना पाहून दुःखी झालोय
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू भारतातील कोरोना संकटाच्या काळात मदतीचा हात देताना दिसत आहेत. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पीएम केअर्स फंडमध्ये 37 लाखांची देणगी दिली. आता माजी क्रिकेटपटू आणि समालोचक ब्रेट लीने मदतीसाठी हात पुढे केला आहे. भारतातील रुग्णालयांत ऑक्सिजन पुरवठ्यासाठी एक बिटकॉईन देण्याचे आश्वासन त्याने दिले आहे. बिटकॉइन एक प्रकारची क्रिप्टो करन्सी आहे. सध्या एका बिटकॉइनची किंमत भारतीय चलनात सुमारे 41 लाख रुपये आहे. ब्रेट लीची ही मदत क्रिप्टो रिलीफच्या अंतर्गत आहे. पॅट कमिन्सच्या मदतीचीही त्याने प्रशंसा केली आहे.
Well done @patcummins30 🙏🏻 pic.twitter.com/iCeU6933Kp
— @BrettLee_58 (@BrettLee_58) April 27, 2021
ऑस्ट्रेलियाकडून 76 कसोटी, 221 एकदिवसीय सामने आणि 25 टी-20 सामने खेळणारा ब्रेट ली म्हणाला की, भारत एकप्रकारे माझे दुसरे घर आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिले की, ‘भारत नेहमीच माझ्यासाठी दुसर्या घरासारखे राहिले आहे. व्यावसायिक कारकीर्द आणि निवृत्तीनंतरही मला या देशातील लोकांकडून खूप प्रेम आणि आपुलकी मिळाली आहे. सध्याच्या साथीच्या आजारामुळे लोकांच्या वेदना पाहून दु:खी झालो आहे. यामुळे भारतातील रुग्णालयांतील ऑक्सिजन पुरवठ्यासाठी क्रिप्टो रिलिफअंतर्गत एक बिटकॉइन देण्याचे वचन देतो.’
त्याने पुढे लिहिले, ‘आता वेळ आली आहे, एकजूट होण्याची आणि गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याची. मी सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचे आभार मानू इच्छितो, जे या कठीण काळात सातत्याने काम करत आहेत. सर्वांना माझे निवेदन आहे की, त्यांनी आपली काळजी घ्यावी. घरीच राहावे, हात धुत राहा आणि गरज पडल्यासच बाहेर पडा. मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. काल केलेल्या मदतीबद्दल शाब्बास पॅट कमिन्स.’
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 27, 2021, 8:00 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY