1 मे रोजी 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार नाही?; वाचा, आरोग्य मंत्री राजेश टोपे काय म्हणाले

मुंबई : राज्यातील नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी लसींची आयात करण्याचा आमचा विचार आहे. 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण पाहिजे त्या गतीने सुरू नाही, असंही त्यांनी सांगितलं. लसीकरण हे कोविन अॅपच्या माध्यमातून करण्यात येईल. त्यामुळे प्रत्येकाने टाईम स्लॉटच्या माध्यमातून जावे. अजून व्हॅक्सिन उपलब्ध नाही. त्यामुळे सर्व राज्यात 1 तारखेला व्हॅक्सिनेशन होईलच असं नाही, असंही टोपे यांनी सांगितलं.
१ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी १२ कोटी डोसेस लागतील. त्याच्या उपलब्धते विषयी आरोग्य विभागामार्फत सिरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. लसीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून एवढ्या मोठ्या संख्येच्या लसीकरणासाठी लसींची उपलब्धता हे मोठे आव्हान आहे. ही लस सरसकट मोफत द्यायची कि आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना याबाबतचा अंतीम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल.याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाने पाठविला आहे. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने टाईम स्लॉटच्या माध्यमातून जावे. अजून व्हॅक्सिन उपलब्ध नाही. त्यामुळे सर्व राज्यात 1 तारखेला व्हॅक्सिनेशन होईलच असं नाही, असे आवाहन टोपे यांनी केले आहे.
राज्यात सध्या १६१५ मेट्रीक टन ऑक्सिजन वापरला जातो. त्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी प्रमाणीत कार्यपद्धती तयार करण्यात आली असून ती सर्व रुग्णालयांना पाठविण्यात आली आहे. नंदूरबार जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन नर्स ही संकल्पना राबविण्यात आली असून ५० रुग्णांसाठी एक नर्स नेमून तिच्या माध्यमातून ऑक्सिजन वापरावर लक्ष ठेवले जाते. ही संकल्पना यशस्वी झाल्याचे दिसत असून अशा प्रकारचा प्रयोग अन्य रुग्णालयांनी राबवणेबाबत सूचना दिल्या आहेत. राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आतापर्यंत १०० पीएसए प्लांटसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत.
या निविदेसंबंधी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार त्रिसदस्यीय समितीला देण्यात आले आहेत. शासनाने ही निविदा भरण्याकरिता तीन दिवसांचा कालावधी दिला असून इच्छुक आपले दर या काळात नोंदवू शकतात. तुम्ही याला पुरवठादारांच्या अपेक्षा जाणून घेण्याचे कुतूहलही म्हणू शकता, असेही मंत्री टोपे म्हणाले.
महाराष्ट्रात सध्या कोरोना संकटाच्या काळात रुग्णांवर उपचारांसाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मोठी मागणी आहे. सोमवारी राज्यात 48,700 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. याबरोबरच राज्यातील एकूण बाधितांचा आकडा 43,43,727 वर गेला आहे. तर एका दिवसात 524 मृत्यूंमुळे एकूण मृतांची संख्या 65,284 वर गेली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 27, 2021, 7:39 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY