VIDEO:लग्नाची वरात पाहताच रुग्णवाहिका चालकाचा PPE KIT घालूनच ठेका
उत्तराखंड: देश सध्या कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहे. काही दिवसांपासून दिवसाला अडीच हजारांहून अधिक जणांचे जीव जात आहेत, तर तीन लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. कोरोनाच्या या भीतीदायक आकड्याने प्रत्येकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कडक निर्बंध तर काही ठिकाणी पूर्ण लॉकडाऊनही जाहीर करण्यात आलं आहे. असं असताना नागरिकांचा हलगर्जीपणा कमी होताना दिसत नाही. होम क्वारंटाइन असणाऱ्या रुग्णाचे नातेवाईक मार्केटमध्ये बेधडक फिरताना दिसत आहे. तर दुसरीकडे लग्न संमारंभही अनेक लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. त्यामुळे देशाच्या चिंता वाढताना दिसत आहेत.विशेषतः असे लोकं जे सध्या रात्रंदिवस कोरोना रुग्णांची देखभाल करत आहेत. यामुळे सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तणावचे वातावरण आहे.
अशातचं सध्या सोशल मीडियावर या रुग्णावाहिका चालकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये रुग्णवाहिका चालक पीपीई कीट घालून वरातीमध्ये जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. जेव्हा हा चालक डान्स करतो तेव्हा आजूबाजूचे लोकं घाबरून बाजूला गेल्याचे पाहायला मिळत आहे. या रुग्णवाहिका चालकाला जेव्हा डान्स करण्यामागेच कारण विचारले असता, तेव्हा तो म्हणाला की, दिवसभर तणावात असतो. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी डान्स करू लागलो. संबंधित घटना उत्तराखंड राज्यातील हल्द्वानी याठिकाणी घडली आहे. यावेळी लग्नाची एक वरात हल्द्वानीतील सुशीला तिवारी रुग्णालयासमोरून जात होती. त्याने अशापद्धतीनं वरातीत डान्स केल्यामुळे बराच गोंधळ उडाला होता. यावेळी वरातीत डान्स करणाऱ्या पाहुण्यांना काय करावं हेही सुचलं नाही. पण अशा पद्धतीनं रुग्णवाहिकेच्या चालकानं डान्स केल्यानं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा व्हिडीओ आता प्रचंड चर्चेत आहे.
थोड़ा हंस भी- ले हल्द्वानी सुशीला तिवारी अस्पताल के आगे से बारात निकलते ही,अस्पताल का एम्बुलेंस चालक बारात में पीपीई किट पहन कर डांस करने लगा, , इसी बीच उसे बारात में अचानक देख बारातियों में भगदड़ मचने की नौबत आ गई। pic.twitter.com/g8tAsC2Rtp
— Amit kumar gour (@gouramit) April 27, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 27, 2021, 6:59 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY