WHO ने व्यक्त केली चिंता ,संघटनेच्या प्रमुखांनी म्हटले – भारतात हृदयद्रावक परिस्थिती
नवी दिल्ली– कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला खूप मोठा फटका बसला असून बिघडती परिस्थिती पाहता WHO ने चिंता व्यक्त केली आहे.संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस गेब्रेयेसस यांनी म्हटले की, भारतात सध्या हृदद्रावक परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णांचे कुटुंबीय रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजनच्या व्यवस्थेसाठी सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये एका आठवड्याचे लॉकडाऊन लावावे लागले यावरुन या गंभीर परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. टेड्रोस यांनी म्हटले की, भारत कोविड-19 च्या भयानक लाटेविरोधात लढाई लढत आहे. रुग्णालय रुग्णांनी भरले आहेत. स्मशानात मृतदेहांची रांग लागली आहे. हे परिस्थिती अत्यंत विदारक आणि हृदद्रावक आहे.
भारतात अनेक आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत असून अनेक देशांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. भारतात सध्या दिवसाला तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. तर दोन हजारारून अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील कोरोना स्थितीवर भाष्य केलं आहे. भारतामधील परिस्थिती गंभीर असल्याचं सांगताना संकटाच्या काळात मदत केली जात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. एक वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
जागतिक आरोग्य संघटना जे शक्य आहे ते सर्व करत आहे. महत्त्वाच्या साधनसामुग्रीचा पुरवठा केला जात आहे, अशी माहिती टेड्रोस यांनी दिली आहे. कोरोना संकटाशी सामना करताना आरोग्य प्रशासनाला मदत करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून 2600 तज्ज्ञ भारतात पाठवण्यात आल्याचंही टेड्रोस सांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, टेड्रोस यांनी जगातील कोरोना रुग्णसंख्या सलग नवव्या दिवशी वाढण्यावरुन चिंता व्यक्त केली. पाच महिन्यात जितके रुग्ण आढळून आले होते तितक्या रुग्णांची गेल्या एका आठवड्यात नोंद झाली असल्याचे सांगत त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य सांगितले. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून भारत चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र भारतात वेगाने होणारी रुग्णवाढ चिंतेचा विषय ठरत असून जागतिक रुग्णसंख्येत मोठा वाटा उचलत आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 27, 2021, 12:10 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY