कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान लोकांना सरकारचा नवा सल्ला – आता घरातही मास्क लावण्याची वेळ आलीये,
नवी दिल्ली :कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे देशभरात होणा ऱ्या संसर्गाच्या वाढत्या घटनांमध्ये सरकारने सोमवारी सोमवारी निती आयोगाने म्हटले, ”आता अशी वेळ आलीये, आता लोकांनी घरातही मास्क घालावा लागेल. याशिवाय आता कोणत्याही पाहुण्याला आपल्या घरात बोलवू नका.” निती आयोगातील आरोग्य मंत्रालयाचे सभासद डॉक्टर वीके पॉल म्हणाले की- ‘सध्याच्या परिस्थितीती भिती पसरवू नका, यामुळे परिस्थिती अजून बिघडू शकते.’
It's time people start wearing masks inside their homes as well: Govt on second wave of COVID-19
— Press Trust of India (@PTI_News) April 26, 2021
एनआयटीआय आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, घरात एखादा संसर्गग्रस्त व्यक्ती असेल तर त्याने मास्क घालावा म्हणजे घराच्या इतर लोकांना त्याचा त्रास होऊ नये. संक्रमित व्यक्तीला स्वतंत्र खोलीत ठेवावे. डॉ. पॉल पुढे म्हणाले की- रिसर्च सांगतो की, एखाद्या व्यक्तीने फिजिकल डिस्टेंसिंगचे पालन केले नाही, तर तो 30 दिवसांमध्ये 406 लोकांना संक्रमित करू शकतो. जर एखाद्या पॉझिटिव्ह व्यक्तीने बाहेर जाणे 50% कमी केले, तर एका महीन्यात 15 आणि 75% कमी केल्यावर फक्त 2-3 लोकांना संक्रमित करेल. होम आयसोलेशनमध्ये संक्रमण नसलेल्या व्यक्तीने मास्क लावला आणि संक्रमित व्यक्तीने मास्क लावला नाही, तर संक्रमणाचा धोका 30% असेल. जर दोन्ही व्यक्तीने मास्क लावला, तर संक्रमणाचा धोका फक्त 1.5% असेल.
सरकारने सांगितल्यानुसार, संपूर्ण देशात आतापर्यंत 14 कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. एक कोटींपेक्षा जास्त लोकांना दुसरा डोसही लागला आहे. झारखंड, गुजरात, छत्तीसगडसारख्या 12 राज्यांना आपल्या 90% पेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस दिला आहे.
मासिक पाळीदरम्यान लसीकरण सुरक्षित
महिलांशी संबंधित एका प्रश्नावर सरकारने म्हटले की, मासिक पाळीदरम्यान लस घेणे सुरक्षित आहे. लसीकरणाचा आणि मासिक पाळीचा काहीच संबंध नाही. याबाबत मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर अफवा पसरत होत्या.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 26, 2021, 8:13 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY