आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून रुग्णसेवा होणार अधिक गतिमान
कर्जत: कर्जतची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, तालुक्यातील रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत,कोणत्याही रुग्णास उपचाराअभावी त्रास सहन करावा लागू नये म्हणून आमदार रोहित पवारांनी कर्जतच्या रुग्णसेवेत पुन्हा एक अद्ययावत रुग्णवाहिका दाखल केली आहे.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२०-२१ अंतर्गत आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यासाठी ही रुग्णवाहिका रुग्णांसाठी उपलब्ध असणार आहे.सध्या कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कर्जत आरोग्यविभाग आणि स्थानिक प्रशासन जीव ओतून काम करत आहे. पवार यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आरोग्यासाठी मतदारसंघात गरजेनुसार जम्बो कोव्हिड सेंटरची उभारणी केली आहे.या सेंटरमध्ये हजारो रुग्णांनी उपचार घेत कोरोनावर यशस्वी मात केली आहे.या सेंटरसाठी लागणाऱ्या आरोग्य सुविधा वेळेत मिळवण्यासाठी त्यांच्याकडुनही शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी राज्यशासनाकडून आरोग्य सुविधांकडे लक्ष दिले जात आहे.रुग्णांना तात्काळ सुविधा मिळाव्यात, त्यांना अत्यावश्यक उपचारासाठी घेऊन जाणे,त्यांना उपचाराच्या ठिकाणाहून पुन्हा घेऊन येणे शक्य व्हावे यासाठी ही रुग्णवाहिका महत्वाची भूमिका बजावणार आहे.
याअगोदरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि सेवाभावी संस्थांच्या मदतीने कर्जत व जामखेडसाठी दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. आता आमदार फंडातून रोहित पवारांनी ही तिसरी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने कर्जतची आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान होणार आहे. १०८ आणि १०२ या टोलफ्री क्रमांकावर उपलब्ध होणाऱ्या रुग्णवाहिकेसोबतच ही रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहोचणार आहे.
❝ कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यशासनाने प्रत्येक मतदारसंघातील आमदारांसाठी आरोग्यावर खर्च करण्यासाठी ठराविक निधी उपलब्ध करून दिलेला आहे.मात्र आ.रोहित पवारांनी राज्यशासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीपेक्षा अधिक निधी मतदारसंघातील आरोग्यसेवेसाठी खर्च केला आहे.कर्जत- जामखेडच्या नागरिकांसाठी ही नक्कीच अभिमानाची बाब आहे ❞
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 26, 2021, 6:59 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY