Breaking News

संतापजनक ! नखांसाठी गरोदर वाघिणीला जिवंत जाळलं

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 26, 2021 6:24 pm
|

Siberian tiger (Panthera tigris altaica), also known as the Amur tiger.

यवतमाळमध्ये (Yavatmal) हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात सोमवारी सकाळी गर्भवती वाघिणीची शिकार करण्यात आली.. या वाघिणीच्या समोरील पायाचे पंजे शिकाऱ्यांनी कापून नेले. यवतमाळ जिल्ह्यात एकाच महिन्यात दोन वाघांच्या शिकारी उघडकीस आल्याने स्थानिक शिकाऱ्यांच्या टोळया या तालुक्यात सक्रिय झाल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या वाघिणीची नखे मिळविण्यासाठी हे दुष्कर्म करण्यात आले. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या वाघिण 4 बछड्यांची आई बनणार होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांढरकवडा वनविभागाअंर्गत मुकु टबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वनकक्ष क्र . ३० मध्ये सकाळी गस्तीदरम्यान वनरक्षकाला वाघिणीचा मृतदेह आढळून आला. याठिकाणी नाल्याला लागूनच एक गुहा आहे आणि या गुहेचा वापर ही वाघीण करत होती. गुहेचे प्रवेशद्वार अतिशय छोटे आहे. स्थानिक शिकाऱ्यांनी हे पाहिले असेल आणि वाघिणीला गुहेत अडकवून ठेवण्यासाठी बांबू आणि इतर साहित्यासह त्यांनी गुहेच्या प्रवेशद्वारावर आग लावली. ती वाघीण मेली आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी त्यांनी तीक्ष्ण हत्यारांनी तिच्या शरीरावर जखमा केल्या. ती मेल्याची खात्री केल्यानंतर तिचे दोन्ही पंजे कापून नेले. दरम्यान, वनरक्षकाने ही माहिती वरिष्ठांना दिली. यावेळी विभागीय वनाधिकारी घटनास्थळी पोहोचले. गर्भवती वाघिणीच्या पोटात चार बछडे होते. आरोपींचा शोध सुरू असल्याचे संबंधित वनाधिकाऱ्यांनी सांगितले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 26, 2021, 6:24 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *