मुंबई पोलिसांकडून 1100 नागरिकांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती, काय असणार जबाबदारी?
मुबंई : पोलीस प्रशासनावरील वाढणारा ताण लक्षात घेत आता मुंबई पोलिसांकडून 1100 नागरिकांना विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. 10 एप्रिल ते 30 एप्रिल अखेर या सर्व विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक असणार आहे. याबाबतचं पत्र देखील त्यांना पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या आदेशान्वये मुंबईत विशेष पोलिस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत बोलताना पोलीस विभागाचे जनसंपर्क अधिकारी डीसीपी एस चैतन्य म्हणाले की, लॉकडाऊनचे नियम झुगारून पोलिसांची पाठ फिरताच विनाकारण रस्त्यावर भटकणाऱ्या नागरिकांनवर छाप बसावा आणि प्रशासनावरील ताण कमी व्हावा या उद्देशाने विशेष पोलीस अधिकारी म्हणून 1100 जणांची तात्पुरत्या स्वरूपाची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. त्या तरुणांना 10 ते 30 एप्रिल पर्यंत विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती पत्रही दिले आहे.
Special police officers are being deployed outside the buildings that were sealed after five or more cases of #COVID19 were found there: Mumbai Police PRO S Chaitanya pic.twitter.com/hI348yctuF
— ANI (@ANI) April 26, 2021
या नागरिकांच्या माध्यमातून मुंबईतील ज्या इमारती सील करण्यात आलेल्या आहेत. त्या इमारतींची देखरेख करणे यासोबतच परिसरामध्ये नागरिकांची गर्दी झाली असेल तरी याबाबत स्थानिक पोलिस स्टेशनला माहिती देणे, इमारतींमधील कोरोना बाधित रुग्णांची मदत करणे यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नागरिक आणि पोलिस यांच्यामध्ये समन्वय निर्माण व्हावा यासाठी विशेष काळजी घेणे अशी जबाबदारी या विशेष पोलिस अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 26, 2021, 6:07 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY