वेदांत हॉस्पिटलमध्ये चार रुग्णांचा मृत्यू, चौकशी करून दोन दिवसांत कारवाई करा
ठाणे,: वेदांत हॉस्पिटलमध्ये चार रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणाची जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती करून चौकशी करावी. तसेच दोन दिवसांत दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
वर्तकनगर येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्देवी असून, निष्काळजीपणामुळे झाली असल्याची ठाणेकरांसह भाजपाची भावना आहे. संबंधित हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरविण्याची जबाबदारी कोणाकडे होती? ऑक्सिजन साठा संपुष्टात येत असतानाही तातडीच्या उपाययोजना का केल्या नाहीत? पुरेसा ऑक्सिजनसाठा ठेवण्याची दक्षता का घेतली गेली नाही? या दुर्देवी घटनेला वेदांत हॉस्पिटलचे व्यवस्थापन, ठाणे महापालिका यांच्यापैकी कोण जबाबदार आहे? या विविध मुद्द्यांबाबत सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून सखोल चौकशी करावी. तसेच दोषींवर दोन दिवसांत कारवाई करावी, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या वेळी माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपाचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेविका मृणाल पेंडसे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सारंग मेढेकर आदी उपस्थित होते.
मृतांच्या नातेवाईकांकडून बिल घेऊ नये
दरम्यान, वेदांत हॉस्पिटलमधील मृत्यूकांड उघड झाल्यावर भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी तातडीने हॉस्पिटलला भेट दिली. तसेच मृतांच्या नातेवाईकांकडून कोणतेही बिल घेऊ नये, अशी मागणी केली.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 26, 2021, 5:39 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY