मुख्यमंत्री कुठेच दिसत नाहीत, मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात;प्रकाश आंबेडकरांच टीकास्त्र
मुंबई : महाराष्ट्रात सध्या कोविडचा हाहाकार चालू आहे, परंतु मुख्यमंत्री मात्र गायब आहेत. त्यांनी एकदाच काही घोषणा केल्यानंतर ते गायब झाले आहेत यापार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टीकास्त्र सोडले . राज्यात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे . या संकटमय काळात मुख्यमंत्री कुठेच आणि कोणाशीही चर्चा करताना दिसत नाही. मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात. जे काही जाहीर करायचं असतं, ते अजित पवारच जाहीर करतात. अजित पवार मला डी फॅक्टो मंत्री वाटतात असेही आंबेडकर यांनी म्हटले आहेत.
आहे. राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. त्यावर “अजित पवार म्हणतात की, रेमडेसिविर राज्य शासन इम्पोर्ट करणार आहे. पण शासनाला तसे अधिकार नाही. त्यामुळे अजित पवार कोणत्या अधिकाराने बोलत आहेत?,” असा सवाल देखील अंबेडकर यांनी उपस्थित केला.
राज्यात करोनाबाधित रुग्ण वाढत आहे. लॉक डाउनमधून ही चेन मोडणार नाही. त्याऐवजी जो पहिला रुग्ण आढळतो. तो किती जणांना भेटला आणि ती व्यक्ती पुढे किती लोकांना भेटली. यांच्यावर कामावर करणारी यंत्रणा निर्माण केली पाहिजे. जर तसे केल्यास चेन तोडणे शक्य होईल, असे आंबेडकर म्हणाले
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 26, 2021, 5:21 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY