चंद्रकांत पाटील यांनी अखेर बोलून दाखवली सत्तेत नसल्याची खंत , म्हणाले..
पिंपरी-चिंचवड: कोरोनाच्या या वातावरणात राजकारण करणं योग्य नाही. मात्र, कोविड आहे काय हवं ते करून घ्या, असंही करून चालणार नाही. शेवटी लोकांनी तुम्हाला अंकूश शक्ती म्हणून निवडून दिलं आहे. आम्हाला राज्यकर्ते म्हणूनच निवडून दिलं होतं. विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो. असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा सत्तेत नसल्याची खंत बोलून दाखवली. ते म्हणाले, सत्तेत नसलो तरी विरोधक आहोत आणि विरोधकांची भूमिका ही अंकूश ठेवण्याची असते. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही घटना आम्ही खपवून घेणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड सेंटरला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. कोविडचा काळ आहे. कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. रेमडेसिवीरचा विषय आता नियंत्रणात आहे. ऑक्सिजनचा विषयही नियंत्रणात येत आहे. ते म्हणाले , क्रिकेटपटू हरभजनसिंह यांनी पुण्यातील नागरिकांच्या RTPCR आणि रॅपिड अॅंटीजेन चाचण्या करण्यासाठी मोबाईल व्हॅन उपलब्ध करून दिली आहे. व्हॅनच्या माध्यमातून आरटीपीसीआर चाचण्या 500 रुपयात आणि रॅपिड अॅंटीजेन चाचण्या 250 रुपयात करण्यात येणार आहेत. तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील व्यक्तींची मोफत टेस्ट करण्यात येणार आहे. दररोज दीड हजार आरटीपीसीआर आणि सहा हजार अँटिजेन टेस्ट या लॅबच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
सुप्रीम कोर्टाने मोदींना फटकारले की बघा कोर्टाने केंद्राला फटकारले, असं संजय राऊत सांगतात, पण महाराष्ट्राला फटकारले की ते मॅनेज असल्याचा आरोप ते करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. पश्चिम बंगालमध्ये 200 हून अधिक जागा मिळणार आणि पंढरपूर जिंकणार असा दावाही त्यांनी केला. आमचा विजय झाला की ईव्हीएम घोटाळा असतो. त्यांचा विजय झाला की सारं काही अलबेल असतं, असा चिमटाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना काढला. केजरीवाल- मोदी वादावरून लक्ष हटवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाल्याच्या वृत्तावर अशी टीका करणाऱ्यांची कीव येते असे ते म्हणाले.
दरम्यान, सीबीआयचा दुरुपयोग होत असल्याचा आरोपवर चंद्रकांत पाटील यांनी म्हटले , कोर्टानेच या प्रकरणाची चौकशी लावली आहे. माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे. त्यात शेवटच्या पॅऱ्यात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश आहेत. यात सत्तेचा दुरुपयोग आला कुठे?, असा सवालत्यावर तुमचं काय म्हणणं आहे का? असेल तर मग उद्याच कोर्टात अवमानना याचिका दाखल करतो, असा इशारा देतानाच लोकांना उल्लू बनवण्याचं काम सुरू असल्याचं म्हटलं . त्यांनी केला.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 25, 2021, 4:03 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY