Breaking News

मोदींची ‘मन की बात’:पंतप्रधान म्हणाले – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक,तरीही आपण नियंत्रण मिळवू

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 25, 2021 2:42 pm
|

Mann Ki Baat: देशातील कोरोनाचे संकट वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज आपल्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या मासिक रेडिओ कार्यक्रमातून पुन्हा देशवासीयांना सकाळी 11 वाजता संबोधित केले . दररोज संक्रमणाच्या नवीन नोंदींमध्ये या प्राणघातक संसर्गजन्य आजारामुळे मोठ्या संख्येने लोक आपला जीव गमावत आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह देशातील बर्‍याच भागात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे.देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून, केंद्र आणि राज्य सरकारं मिळवू पूर्णपणे आपण नियंत्रण आणू असे मोदी यांनी सांगितलं. यावेळी पंतप्रधानांनी देशातील विविध भागात कार्यरत असलेल्या पहिल्या फळीतील कोविड योद्ध्यांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी लोकांच्या मनातील काही शंका उपस्थित केल्या.

कोरोना संकट अधिक गडद झाल्याने सरकारने 1 मेपासून 18 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयोगटातील सर्व लोकांना लसीकरण देण्याची घोषणा केली आहे. कोविशिल्ट आणि कोवाक्सिन या दोन लस सध्या देशात दिल्या जात आहेत. पंतप्रधान मोदीं भाषणात म्हणाले , माझी राज्यांना विनंती आहे की, त्यांनी भारत सरकारच्या मोफत व्हॅक्सीन अभियानचा लाभ जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोहोचवावा. ‘अनेक डॉक्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना माहिती देत ​​आहेत. ते लोकांशी फोनवर, व्हॉट्सअ‍ॅपवरही सल्ला देत आहेत. बर्‍याच रुग्णालयांच्या वेबसाइट्स आहेत जिथे कोरोनाशी संबंधित बर्‍याच माहिती देखील उपलब्ध आहेत आणि तिथे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. हे खूप कौतुकास्पद असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

सर्वात पहिले मोदींनी मुंबईच्या डॉ. शशांक यांच्यासोबत चर्चा केली. या दरम्यान डॉ. शशांक यांनी सांगितले की, लोक खूप उशीरा ट्रीटमेंट सुरू करतात. सरकारी सूचनांचे पालन केले तर अडचणींचा सामना करावा लागणार नाही. योग्य आणि स्वस्त औषध घेतले पाहिजे. ऑक्सिजनही द्यावे लागते. असे होतेय की, रेमडेसिविर आहे, यामुळे रुग्णालयात कमी दिवस राहावे लागत आहे. याच्या सुरुवातीच्या वापराने फायदा आहे, मात्र यामागे पळू नये. डॉक्टरांनी सांगितले तरच घ्यावे. प्राणायामने जास्त फायदा होईल. रक्त पातळ करणाऱ्या इंजेक्शनने लोक बरे होतात. सल्ला घेणे आवश्यक आहे. महागड्या औषधांच्या मागे पळणे आवश्यक नाही.

यानंतर मोदींनी डॉ. नाबिद यांच्यासोबत चर्चा केली. या दरम्यान नाबिद म्हणाले की, भीतीचे वातावरण होते, कोविडला मृत्यूच मानले जात होते. दुसऱ्या लाटेमध्येही पॅनिक होण्याची गरज नाही. प्रोटेक्टिव्ह मार्ग आणि प्रोटोकॉलचे पालन केले तर सुरक्षित राहू शकता. मास्क घाला, सोशल डिस्टेंसिंग ठेवा. आपल्याकडे दोन व्हॅक्सीन कोव्हॅक्सिन आणि कोवीशिल्ड आहे. जम्मू-कश्मीरविषयी बोलायचे झाले तर येथे 15-16 लाख लोकांनी लस घेतली आहे. सोशल मीडियावर साइड इफेक्टविषयी भ्रम होता. अजुनपर्यंत आम्हाला हे दिसलेले नाहीत. व्हॅक्सीन घेतल्यानंतर ताप वगैरे येणे हे सामान्य आहे. व्हॅक्सीननंतर लोक पॉझिटिव्ह होऊ शकतात. मात्र आजार गंभीर होणार नाही. जीवघेणा ठरणार नाही.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 25, 2021, 2:42 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *